लोणंद जवळील  अपघातात मोटरसायकल वरील तीनही युवक जागीच ठार.. 

0

फलटण :

               गुरुवार दि. 6 एप्रिल रोजी लोणंद नीरा रस्त्यावर असलेल्या उड्डाण पुलावर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यामध्ये धडक होऊन त्यामध्ये मोटरसायकल वरील तीनही युवक जागीच  ठार झाले

                                      उड्डाणपुलाजवळ मंगळवेढा पुणे बस क्र।  एम एच 20 बीएल 4158 आणि लोणंद कडे निघालेली मोटर सायकल क्रमांक एम एच 12 आर व्ही   3158 यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ओंकार संजय थोपटे पोपट  अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे सर्वजण रा.  पिंपरी खुर्द ता.  पुरंदर हे तीन तरुण अपघातात ठार झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तसेच उपनिरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे आणले.. या अपघाताची  नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here