गोंदवले – स्नेह संमेलनात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनाच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याकरिता त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आणि पारितोषिक वितरणाचा संयुक्तिक कार्यक्रम प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत पार पडला.
लोधवडे प्राथमिक शाळेचे उपक्रमशील व होतकरू प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या बेस्ट नियोजनात हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.लोधवडे गावात झालेल्या विद्यार्थ्यांनाच्या गड-किल्ले स्पर्धा आणि वर्षभरातील विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलाने करण्यात आली.
त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला.यामध्ये विद्यार्थ्यांनाच्या गड-किल्ले स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षीस १५०१रु., द्वितीय क्रमांक १००१रु., तृतीय क्रमांक ७५१रु., उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक ५५१ रु. तर उत्तेजनार्थ पाचव्या क्रमांकासाठी ३५१ रुपयांचे बक्षीस अशी ही सर्व बक्षिसे ट्रॉपी व सुंदर प्रशस्तीपत्रकासह यावेळी वितरित करण्यात आली.याशिवाय शाळा स्तरावरील रांगोळी, हस्ताक्षर, वक्तृत्व,निबंध,चित्रकला,इंगजी स्पीच,पाढे पाठांतर,कविता गायन तसेच राज्य,जिल्हा आणि तालुका स्तरावरील क्रीडा व पर्यावरणपूरक उपक्रमातील स्पर्धांच्या यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांनाकरिता विशेष आकर्षक प्रशस्तीपत्रकासह दर्जेदार शैक्षणिक साहित्यांची बक्षीसे ठेवण्यात आली होती.तसेच सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल व्यक्तिमत्त्व स्पर्धेनंतर्गत मोठ्या गटातील निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविणाऱ्या कु.दृष्टी सुनिल मोरे ह्या विद्यार्थ्यांनीचा मान्यवरांच्या शुभ हस्ते तिचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालक यांच्यासह मोठा नागरी सत्कार करण्यात आला.
याशिवाय शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम व नव-नवीन प्रयोग करीत सर्वच क्षेत्रात लोधवडे प्राथमिक शाळेत विकासात्मक शैक्षणिक बदल घडविणारे,तिच्या विकासासाठी सातत्याने धडपड करून शाळेला अतिउच्च अशा यशस्वीतेच्या शिखरावर पोहचविण्यासाठी प्रयत्न करणारे मार्गदर्शक शिक्षक यांचाही यावेळी गावच्या वतीने मोठा नागरी सन्मान करण्यात आला.
गड-किल्ले स्पर्धेसाठी बक्षीस देणारे अनुक्रमे दाते पुढीलप्रमाणे आहेत. ब्रम्हचैतन्य कृषी सेवा केंद्राचे मालक धनंजय जाधव,चेअरमन सचिन जाधव,कस्टम ऑफीसर अमोलसिंह जाधव,अभिजित मगर,अध्यक्ष कुंडलिक चोपडे,त्रिवेणी मोरे तर ट्रॉपी देणारे उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे व इतर स्पर्धांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बक्षिसे देणारे पतसंस्था चेअरमन विजय माने, शशिकांत देशमुख,उपसरपंच वैशालीताई देशमुख हे मान्यवर आहेत.
या वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षिस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थितीमध्ये लोधवडेचे गावचे सरपंच मा.निवास काटकर, उपसरपंच वैशालीताई देशमुख व इतर ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील अनिल लोखंडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे,उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे व इतर सदस्य,वैभव मोरे, रामदास जाधव,राजकुमार माने,शिवाजी मोरे,पोपट जाधव तसेच हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी झटणारे शाळेचे मुख्याध्यापक मा.महादेव ननावरे,सहकारी शिक्षक दिपक कदम,सतेशकुमार माळवे, सुचिता माळवे,संध्या पोळ,दिपाली फरांदे,मनिषा घरडे व आश्विनी मगर हे सर्व होते.या कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक आणि संपूर्ण अँकरिंग सतेशकुमार माळवे सरांनी केले तर शेवटी आभार दिपक कदम यांनी मानले.अशा या सुंदर कार्यक्रमाचे शिक्षणासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी,बहुसंख्य ग्रामस्थ व पालकांनी जोरदार कौतुक केले.