सातारा : पोटात वळवळ तरच चळवळ अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी एकसंघपणाने कार्यरत राहिले पाहिजे.यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये वंचितला हास्यास्पद मते पडली आहेत. तेव्हा यापुढे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन आगामी निवडणुकास सामोरे गेले पाहिजे. असे प्रतिपादन वंचितचे जिल्हा संघटक सुभाष पुजारी यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी सातारा शहर जनसम्पर्क कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन बुधवारपेठ येथे वंचितचे कायदेशीर सल्लागार ऍड.दयानंद माने, जावली तालुकाध्यक्ष प्रताप सपकाळ,ज्येष्ट पत्रकार अनिल वीर आदींच्या हस्ते संपन्न झाले. तेव्हा पुजारी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप होते. पुजारी पुढे म्हणाले,”मिलिंद कांबळे यांच्यासह ७ ते ८ नगरसेवक झाले पाहिजेत. यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन वाढवले पाहिजे.”
अनिल वीर म्हणाले,”वंचितच्या कार्यालयामुळे मिलिंदभाऊनी पहिली लढाई जिंकली आहे.ते स्वतः नगरसेवक होतीलच. शिवाय,आरक्षण पडलेच तर नगराध्यक्षही होतील.त्यांचा साधा सरळ स्वभाव व विशाल दृष्टिकोनातून असल्याने जिल्ह्यांतून पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून आलेले आहेत.त्यांच्या पाठीशी नक्कीच बहुजन समाज राहील.”
वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले, “मिलिंदभाऊनी पक्ष कार्यालय स्थापन करून वंचितची घोडदौड सुरू केली आहे.त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येईल.त्यांनी शहरातील प्रभाग क्र.८ मधील सर्व राहिवासींना शनिवार व रविवार या दिवशी सायंकाळी ६ ते रात्रौ ९ या वेळेत मोफत औषधोपचार मिळणार असून अत्यावश्यक सेवाही विना शुल्क वाहन मिळणार आहे. वयोवृद्धासाठी प्रति महिना आरोग्यशिबीरे घेऊन मोफत औषधे दिली जाणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी शववाहिनी व शेणकुट सोडुन सर्व खर्च केला जाईल.सन २०२५ पासुन ज्या दाम्पत्यास कन्यारत्न होईल.त्या सुकन्येचा पहिला हप्ता वंचिततकडून भरला जाईल.”
प्रताप सपकाळ म्हणाले, “लोकांपर्यंत पोहचण्याचा राजमार्ग कार्यालयाच्या माध्यमातून होईल.मिलिंद भाऊंचे नक्कीच उज्वल यश आहे.” युवा सचिव अमोल गंगावणे म्हणाले,”मिलिंद भाऊंनी शहरापासून केलेले कार्य पाहता.सध्या रिक्त असलेले जिल्हाध्यक्षपदही मिळू शकते.” ऍड.दयानंद माने म्हणाले, “कार्यकर्त्यांचे मोहळ असल्याने वंचित वाढण्यासाठी मिलिंदभाऊ कार्य करतील.”
बाळासाहेब जगताप म्हणाले, “वंचितला आलेल्या अनुभवतातून उभारी घेऊन सर्व ताकद मिलिंद भाऊंच्या पाठीशी ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे.” महासचिव योगेश कांबळे (जावली) यांनी सूत्रसंचालन केले.संपूर्ण विधी किरण कांबळे यांनी पार पाडला.महापुरुषांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
मिलिंद कांबळे यांनी सध्या प्रभाग क्र.,८ साठी लोकांच्यासाठी सुरू केलेल्या योजना संपूर्ण शहरात देण्याचाआपला माणस असल्याचे बोलून दाखवले.शेवटी मिलिंदभाऊनीच उपस्थितांचे आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास जिल्हा युवा सचिव अमोल गंगावणे,पाटण तालुकाध्यक्ष संजय जाधव व महासचिव संजय शिंदे जावली तालुका उपाध्यक्ष अशोक भोसले,सातारा सचिव दीपक चव्हाण,उपाध्यक्ष रवींद्र शेडगे व नितीन पोळ,सिने अभिनेते कवी रोहन भोसले, अमोल जानराव, श्रीरंग इंगवले, संदेश गायकवाड, निलेश कांबळे,सुरेश चव्हाण, सनी कांबळे,विकास जाधव, रमेश धडचिरे,कुमार ओव्हाळ, किरण आवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.