वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्यचे राज्यस्तरीय पहिले साहित्य संमेलन मार्गदर्शक व ऐतिहासिक होईल  : प्रशांत आंधळे

0

पुसेगाव दि.17 निसार शिकलगार 

क्षञिय कुळवंशातील दैवी कुळाशी थेट संबंध असणारा अंत्यंत शूर ,चंचल, तेजस्वी, बुद्धिवान असणारा वंजारी समाज व नाथ संप्रदायाचे सद्गुरु संत अवजीनाथ महाराज, सद्गुरु वामनभाऊ महाराज व राष्ट्रसंत भगवानबाबा कुलदैवत रेणुकामाता व स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब राजकिय दैवत मानणारा हा  समाज व या समाजाचं पहीले साहित्य संमेलन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित.

      रविवार दिनांक 25/12/2022 रोजी  सकाळी 8 ते 7 वाजेपर्यंत मराठा विद्या प्रसारक समाज रावसाहेब थोरात सभागृह,  गंगापुर रोड ,नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. हे एकदिवसीय साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल असे समेलंन स्वागताध्यक्ष श्री प्रशांतजी आंधळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विदर्भ साहित्य रत्न जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबारावजी मुसळे  मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. आणि संमेलन अध्यक्ष साठी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे  लाभले आहेत.सोबतच राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरसुद्धा  उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन  नवोदित साहित्यिकांना नवी दिशा देणारे ठरेल.

     सदर संमेलन हे मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचं व्हावं आणि वंजारी समाजाने एक आदर्श प्रस्थापित करावा म्हणून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक गणेश खाडे यांच्यासह साहित्य आघाडीच्या राज्य मार्गदर्शक सौ लता गुठे महिला साहित्य आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सौ शितल नागरे, चोले राज्य सरचिटणीस साहित्य आघाडी सौ सिंधुताई दहिफळे यांच्यासह  यांच्या आयोजन समितीद्वारे संमेलन यशस्वीरित्या पार पडेल.

    संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा  आयोजन समितिचे  अध्यक्ष नाशिक जिल्ह्य ,सिन्नर तालुक्यातील खंबाळा गावाचे भुमिपुत्र  आणि प्रसिद्ध   टॅक्स  व्यवस्थापन आणि  अकाऊंटस आॅडिट क्षेत्रात अग्रगण्य आणि गुजराती भाषा ज्ञात असलेले  प्रशांतजी आंधळे व स्वागत अध्यक्ष समितीचे सदस्य सर्व सन्माननीय सदस्य आणि नाशिक चे अनेक मान्यवर लेखक कवी यांचाही सहभाग आहे. तसेच नाशिककरांचे सहकार्य आहेच . 

     सदर साहित्य संमेलन हे तीन सत्रांमध्ये होईल पहिल सत्र  उद्घाटन सोहळा , सकाळी ८ ते १ दुपारी १ ते २ भोजन. दुसरं सत्र दुपारी २ -३   परिसंवाद, ३-ते४ कथाकथन आणि संध्याकाळी ५ वाजता तिसरं सत्रं  कवीसंमेलन आणि  समारोप अशा पद्धतीने संमलेनाची रूपरेषा असेन. हे साहित्य संमेलन भविष्यातील पिढीसाठी नवचैतन्य निर्माण करणारं असेल

   संमेलनाचा प्रमुख हेतू हा आहे की समाज बांधवांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी , वंजारी समाजाचा इतिहास , खाद्य संस्कृती, सामाजिक स्थान , सामाजिक संस्कृती,तसेच समाजातील विविध समस्या अडचणी आणि राष्ट्र निर्माणासाठी वंजारी समाजाचे योगदान इत्यादी विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित व्हावे व यानंतरच्या अशाच कार्यक्रमातून वेळोवेळी यावर मार्गदर्शन हे व्हावे.

      समाजाच्या प्रति सर्वधर्मसमभाव, सामाजिक परिवर्तन घडवायचे असेल तर प्रामुख्याने विचारांचे देवाण-घेवाण झाली पाहिजे. यासाठी समाजातील यशस्वी दिग्गज व्यक्तींचे समाज बांधवांना मार्गदर्शन करून सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदतीचा हात देऊन इतरांना रोजगार व स्वयंरोजगार, उद्योगाच्या संदीप उपलब्ध करून कशा देता येतील यावर विचार करणे. जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे. साहित्य आणि समाज यांचा समन्वय घडवून योग्य समन्वय होऊन सामाजिक संस्कृती आणि वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे भविष्यातील पिढी संस्कारयुक्त घडली पाहिजे यासाठी साहित्य हे वैचारिक परिवर्तनाचे साधन आहे आणि त्याचा प्रभावी अस्त्र म्हणून वापर झाला पाहिजे . हे साहित्य संमेलन ऐतिहासिक होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन  साहित्य संमेलन  स्वागताध्यक्ष श्री प्रशांतजी आंधळे (जिल्हा नाशिक) यांनी व्यक्त केले.तसेच काही माहिती साठी त्यांचा सम्पर्क क्रं.9967869209 हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here