सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जातात.शिवाय, वंदनेनंतर सकारात्मक विषयावर चर्चा विनिमय होत असतात. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ नियमित होणाऱ्या वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हा वरील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. येथील पुतळ्याजवळ सकाळी १०।। वा.बुधवार दि.१ जानेवारी २०२५ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन व शनिवार दि.३ जानेवारी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती दिन साजरा करणे आदी विषयांवर चर्चा-विनिमय करण्यात आला.
शौर्य दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येणार असून भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायी जात असतात.त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या असून सातारा येथे अभिवादन होणार आहे. तद्नंतर काही अनुयायी भीमा-कोरेगावला जाणार आहेत.याशिवाय, महिला मुक्तीदिनही साजरा करून नायगाव या ठिकाणीही अभिवादन करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे.
प्रथमतः अशोक भोसले व मारुती भोसले यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला.शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी, “भीमा-कोरेगाव” यावर पहाडी आवाजात पोवाडा सादर केला. यावेळी सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सरचिटणीस बी.एल. माने,त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्ममित्र विश्वास सावंत,राहुल देवकांत, मिलिंद कांबळे, धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे विलासराव कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे व सहकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,उपाध्यक्ष माणिक आढाव,कार्याध्यक्ष अनिल वीर, अशोक कांबळे, साळुंखे,उत्तम पोळ,सत्यवान गायकवाड,अंकुश धाइंजे,वसंत गंगावणे,प्राचार्य मोहन शिर्के,अमर गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, धम्मबांधव मोठया संख्येनी उपस्थीत होते.