गोंदवले – माणसे गटशिक्षणाधिकारी श्री.एल.एम.पिसे व शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वडजल केंद्रांचे केंद्रप्रमुख दिपक पंतगे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.शाळा खिंडवाडी येथे माहे नोव्हेंबर महिन्याची शिक्षण परिषद संपन्न झाली. प्रथम सत्रात व्ही.सी.द्वारे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशीनी नागराज यांनी सर्व शिक्षकांना शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढीसाठी योगदान देवुन संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
तदनंतर स्वागत प्रास्ताविक संगीतमय परिपाठ खिंडवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भारती जाधव यांनी सादर केला, नियमित बाबींचा आढावा चर्चा शाळानिहाय चर्चा ढाकणी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल महामुनी यांनी घेतला, PAT 2 परीक्षा विश्लेषण वडजल माध्यमिक शाळेचे उपशिक्षक विठ्ठल कुंभार यांनी केले, कोंडीग प्रशिक्षण बाबत LFE /पायजाम फौंडेशन बाबत पानवण माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक विजय नरळे यांनी माहिती सांगितली. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण बाबत जि.प.शाळा पाणवन शाळेतील पदवीधर शिक्षक सुभाष गोंजारी यांनी विस्तृत माहिती दिली,
नवोपक्रम बाबत ढाकणी माध्यमिक शाळेचे उपशिक्षक आनंदा सावंत यांनी माहिती सांगितली,अध्ययन निष्पत्तीनुसार मासिक नियोजन जि.प.शाळा पाणवन शाळेतील उपशिक्षक अनिल काळे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख दिपक पंतगे यांनी केंद्रातील गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम, गरजांवर चर्चा करुन शाळानिहाय आढावा घेऊन मार्गदर्शन केले. सदर शिक्षण परिषदेचे सुत्रसंचलन खिंडवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भारती जाधव यांनी केले तर आभार श्री.रमेश शिंदे सर यांनी मानले.