सातारा : भारतीय बौद्ध महासभेचे कोरेगाव मा. तालुकाध्यक्ष बंधुत्व धम्मरत्न अनिल कांबळे यांच्या आई कालकथीत गिताबाई शंकर कांबळे यांचा तृतीय स्मृतिदिन व मुलगा कालकथीत अमित अनिल कांबळे यांचा द्वितीय स्मृतिदिन यांच्या संयुक्तिक कार्यक्रमात मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
वाठार किरोली (कोरेगाव) येथील तक्षशिला बुद्ध विहारात संपन्न झाला. यावेळी तक्षशिला महाबुद्धविहाराचे अध्यक्ष सुनिल कांबळे,बापूराव लोंढे,राजेंद्र बनसोडे,मनीषा सुनील जगताप, बौद्धाचार्य आबासाहेब दणाने, दादा झेले, दिलीप टिळक,माजी श्रामनेर मंगेश बनसोडे (सुर्ली), पोपट कांबळे, नित्यानंद कांबळे, श्रीधर वाघमारे(आर्वी),प्रकाश कांबळे(काशीळकर),चंद्रकांत खंडाईत, बाळासाहेब सावन्त, अनिल वीर,ताटे तारगावकर व त्यांची सहकारी मंडळी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.