वाठार स्टेशन येथील ओंकार पोरे यांना राष्ट्रीय कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान

0

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन क्षेत्रातील उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल  वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील कृषीवल ॲग्रो चे युवा कृषी उद्योजक ओंकार महादेव पोरे यांना राष्ट्रीय युवा दिनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय कृषी उद्योजक हा पुरस्कार कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय सचिव श्रीमती शुभा ठाकूर यांच्या हस्ते  दिल्ली येथे देण्यात आला.

यावेळी कृषी मंत्रालाचे अतिरिक्त आयुक्त संजय कुमार, कृषी मंत्रालयाचे संचालक साजितकुमार कुन्हालाथ हैद्राबाद येथील महानिर्देशक डॉक्टर पी.चंद्रशेखर , नाबार्डच्या महाव्यवस्थापिका श्रीमती निवेदिता तिवारी , स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक शंतनू पेंडसे , संमनती फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार, डॉ शहाजी फ़ंड उपसंचालक मॅनेज हैद्राबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here