सातारा/अनिल वीर : जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विज्ञान आणि चमत्कारतून मनोरंजन हा कार्यक्रम सरस्वती विद्यालय, कोरेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
म.अंनिसचे राज्य बुवाबाजी विरोधी अभियान विभागाचे सदस्य भगवान रणदिवे, अॅड. हौसेराव धुमाळ,सचिव प्रकाश खटावकर,जिल्हाध्यक्ष सी.आर. बर्गे,मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत अंनिसची टिम व कोरेगाव येथील हिचचिंतक ग्रामस्थ बंधु भगिनी यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बर्गे व आझाद कॉलेजचे सुमेध राजे व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.