विज्ञान व संविधानावर भारत जगात अग्रेसर राहील : अरुण कांबळे

0

सातारा : सन २०१४ पासून संविधानावर षंढयंत्र सत्ताधारी राबवत आहेत.तेव्हा विज्ञान व संविधान यावर देश चालला तर जगात नवसमाज निर्माण करण्यात आघाडीवर राहील.असे प्रतिपादन ज्येष्ट साहित्यिक अरुण कांबळे यांनी केले.

     भोर येथे १० व्या राज्यस्तरीय फुले,शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनात मान्यवरांना अरुण कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.तेव्हा ते बोलत होते.अरुण कांबळे म्हणाले,”आ.नितीन राऊत सारखे नेते बाबासाहेब यांच्या विचारावर कृतीयुक्त बोलतात. तेव्हा चारोळ्या करून हास्यास्पद वर्तन करू नये.(सभागृहात अनेक काळ हास्या पिकला.) १५ वर्षात जनतेच्या मालकीचे काहीही राहिले नाही.नुसते पुतळे उभारून चालणार नाही. तर मेडिकल कॉलेज,आंतरराष्ट्रीय स्कुल वैगरे निर्माण करणे गरजेचे आहे. रस्त्यावर येऊन लढण्याचीही वेळ आली आहे.श्रमास शिक्षणात महत्व आहे.म.फुले यांच्या सुत्रानुसार कर्मवीर अण्णा व डॉ.आंबेडकर यांनी शिक्षण दिले.”

          प्रथम दिवशी ध्वजारोहण, संविधान रॅली तद्नंतर संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी डॉ.अभिजीत होसमनी होते. यावेळी डॉ.मिलिंद मेश्राम व डॉ.अमोल देवळेकर यांचेही मार्गदर्शन झाले.ग्रंथदालन उद्घाटन कश्यपदादा साळुंके यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी प्रसाद शिंदे होते.

   

दुसऱ्या दिवशी बंधुत्व साहित्यरत्न डॉ.शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महामानवांच्या प्रकाशवाटांचा विचारवेध या लिखित पुस्तकावर अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी डॉ. ज्ञानदेव मस्के,रामदासजी काकडे, संग्रामदादा थोपटे, चंद्रकांतदादा जगताप व महादेव मोरे उपस्थीत होते.

पुरस्कार वितरण : यावेळी ज्येष्ट साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते,” दिवंगत खासदार बाबासाहेब साळुंके स्मृती सन्मान पुरस्कार” डॉ.नितीन राऊत (माजी मंत्री) यांना तर रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील (सातारा) यांना,” छ.शाहु महाराज – पिलर ऑफ एज्युकेशन” प्रदान करण्यात आला.याशिवाय, प्राचार्य डॉ. वौशाली प्रधान व  मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांना विशेष सन्मानीत करण्यात आले.

 

 “जागर संविधानाचा” या कार्यक्रमात काव्य नाट्य संगीतमय आंबेडकर जलसा संपन्न झाला. सादरकर्ते शिरीष पवार,हर्षद कांबळे,प्रवीण डोणे आणि सहकलाकार,मुंबई यांनी सहभाग घेतला.समारोपप्रसंगी प्राचार्य – प्राचार्या डॉ.वृषाली रणधीर,डॉ. गुरुनाथ फगरे, डॉ.संजय कांबळे, डॉ.प्रकाश पवार,डॉ.मेघना भोसले, डॉ. प्रमोद धिवार व डॉ.गौतम बनसोडे उपस्थीत होते.याकामी, संयोजन समितीचे अध्यक्ष राहुल गायकवाड,कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव,प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख,प्राचार्य डॉ.संभाजी मलघे व डॉ.इम्रान खान आदींनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here