गोंदवले – वृक्ष माझा दोस्त जीवन बने मस्त
सध्या पर्यावरण धोक्यात येऊ लागले आहे. सगळीकडे प्रदूषणाचा विषारी विळखा वाढत आहे.तापमानात सारखा चढ-उतार होत आहे.वृक्षांची संख्या कमी होत आहे.दिवसेंदिवस जीव सृष्टीचा धोका वाढत आहे.त्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपनाचा कृतीयुक्त जागर करणारा अनोखा उपक्रम सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वृक्ष व पर्यावरणप्रेमी उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या नव संकल्पनेतून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांने त्याला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या चांगल्या वृक्षाचे रोपटे भेट म्हणून आणायचे. ते वाढदिवसाची आठवण म्हणून या दिवशी विद्यार्थ्यांकरवी आनंदाने शाळेत लावायचे.त्याला खत व पाणी घालून त्याच्या संगोपनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांनाकडेच सोपवायची.
गेल्या वर्षभरात वृक्ष माझा दोस्त जीवन बने मस्त हा उपक्रम लोधवडे प्राथमिक शाळेत राबविण्यात येत आहे.
या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत अनेक छोट्या-मोठ्या झाडांची लागवड करून त्याचे सध्या शाळेत चांगले संगोपनही सुरू आहे. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मा.महादेव ननावरे,सह शिक्षक दिपक कदम, सतेशकुमार माळवे,सुचिता माळवे, संध्या पोळ,दीपाली फरांदे व मनिषा घरडे हे सर्वजण सक्रिय सहभागी आहेत.
सध्या वृक्षारोपण आणि संगोपनाचा मोलाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रासह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ,पालक वर्ग व पर्यावरणप्रेमींच्या मधून जोरदार असे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.