गोंदवले – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधी सेवा समिती यांच्या वतीने दहिवडी येथील मार्केट कमिटीच्या सभागृहात ” महिला सन्मान मेळावा ” उत्साहात साजरा साजरा करण्यात आला. प्रारंभी सावित्रीमाई फुले च्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.महिलांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांचे बौद्धिक सक्षमीकरण करण्याचे जे काम संस्थेमार्फत सुरू आहे त्याची माहिती संस्थेच्या सचिव भारती पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
ग्रामीण रुग्णालयाच्या ऍड शीतल शिंदे यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी,ताजा सकस आहार,योग्य व्यायाम ,वयक्तिक व घरातील स्वच्छता कशी ठेवावी याची माहिती दिली. विधीसेवा समितीच्या ऍड सुजाता बागल यांनी महिला ,मुले व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांसाठी विधी सेवा समितीमार्फत मोफत वकील पुरविला जातो त्यामुळे महिलांनी स्वतःवरील अन्याय,मुलांचे होणारे शोषण याविरुद्ध न्याय मागण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. महिला समुपदेशन केंद्राच्या आरती कदम यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत खंत व्यक्त करून महिलांनी सावध व जागृत राहिले पाहिजे असे सांगून आपल्या सक्षमीकरणासाठी शिवणकाम, ब्युटी पार्लर असे लघुउद्योग व शेळीपालन,कुकुटपालन यासारखे शेतीपूरक उद्योग सुरू करावेत असे सांगितले
कार्यक्रमाच्या शेवटी संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात आला त्यात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला .प्रथम तीन क्रमांकाना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यथोचित बक्षीस वितरित करण्यात आले .कार्यक्रमास ऍड स्वाती ढालपे,संस्थेचे खजिनदार युवराज भोसले,पत्रकार महेंद्र भोसले,जलनायिका अस्मिता तुपे,कोरोच्या नीलम शेंडगे,अर्चना वाघमारे,ज्योती मिसळे,शीतल मिसळे,आशा गोसावी,मिनाज शेख,मनीषा दीक्षित,शैला काटकर,सिंधुताई यादव,छाया पांढरे,वंदना कुंभार, कोळी मॅडम ,पौर्णिमा बनसोडे,आशा शिंदे,सीता मोटे, सारिका गायकवाड आदि महिला उपस्थित होत्या उपस्थितांचे आभार व कार्यक्रमाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँड सौ सुजाता बागल यांनी परिश्रम घेतले