विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे येथे परमपूज्य ब्रह्मानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन महोत्सव व सत्संगाचे आयोजन.

0

वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे : 

          विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे येथे वर्धापन दिनानिमित्ताने भव्य दिव्य असे किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे येथील मठाचा १५ वा वर्धापनदिन मोठ्या थाटामाटात साजरा होत असून ९ मार्च ते १२ मार्च या कालावधीत महाराष्ट्रातून ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकारांची मांदिआळी या वर्धापन दिनाला पहावयास मिळणार आहे त्याच पद्धतीने या वर्धापनदिनाला सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोज रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन सेवेचे आयोजन केले असून यामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प संतोष महाराज पायगुडे खडकवासला, पुणे यांची होणार आहे तर शुक्रवारी १० मार्च रोजी ह.भ.प पारस महाराज मुथा भागवताचार्य नगरसुपा यांची होणार आहे तसेच शनिवार ११ मार्च रोजी ह.भ.प श्रावण महाराज अहिरे नाशिक, कुकाणेकर यांची होणार आहे याच दिवशी रात्री ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सव होणार आहे  यामध्ये कोरेगाव – खटावचे विद्यमान आमदार महेश शिंदे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा भोसले, ह.भ.प पांडुरंग देसाई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी १२ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकमठाण व महाराष्ट्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ साधू संतांचा दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे

तरी भाविक भक्तांनी या आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाला व    सत्संगतला आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे येथील परमपूज्य ब्रह्मानंद महाराज यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here