वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे :
वाठार स्टेशन ता. कोरेगांव येथील शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुरेश विठ्ठल सकुंडे व व्हा. चेअरमनपदी मोहन शांताराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शरद पतसंस्थेसाठी १३ संचालकाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली होती चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी . प्रिती काळे मॅडम सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोरेगांव यांच्या उपस्थितीत पार पाडली.
शरद पतसंस्था उत्तर कोरेगांव तालुक्यातील राज्य कार्यक्षेत्र असणारी अग्रगण्य पतसंस्था असुन गेली ३५ वर्षापासून कार्यरत आहे पतसंस्थेच्या आजपर्यतच्या बिनविरोध निडणुकीची परंपरा कायम राखत याहीवेळी सर्व संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत.
संस्थेचे बिनविरोध निवड झालेले संचालक प्रा. सदाशिव राजाराम भोईटे, सुरेश विठ्ठल सकुंडे, दिनकर नारायण कदम, गुलाबसिंग निवृत्ती कदम, रामचंद्र गोपाळराव चव्हाण, बाळकृष्ण रामचंद्र चव्हाण, धनंजय प्रतापराव धुमाळ, लक्ष्मण राजाराम भोसले, शिवाजी सुभाना दोरके, मोहन शांताराम शेळके, सुरेश श्रीरंग कर्पे, श्रीमती माधवी अविनाश शिंदे, सौ. विमल आनंदराव चव्हाण.
संस्थेचे संस्थापक एस. आर भोईटे यांनी विद्यामान चेअरमन बाळकृष्ण चव्हाण सर व्हा. चेअरमन धनंजय धुमाळ यांनी संस्थेची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्व सभासद सर्व आजी माजी संचालक, संस्थेचे कर्मचारी, सर्व सल्लागार व हितचिंतक यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसचे निवडणुक निर्णय अधिकारी सौ. प्रिती काळे मॅडम सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोरेगांव यांचेही आभार मानले.
नुतन पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार साहेब, श्रीमंत छञपती उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर,
आ.शशिकांत शिंदे. आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ मकरंद पाटील, जिल्हा बँकचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, संजीवराजे निंबाळकर ,तसेच वाठार स्टेशन वाठार स्टेशन परिसरातील व जिल्हयातील विविध पक्षातील मान्यवरांनी अभिनंदन केले.