शाहीर माधव भोसले जनसामान्यातील लोकशाहीर होते : अनिल वीर 

0

सातारा : कालकथीत शाहीर माधव भोसले यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून शाहिरांच्या माध्यमातुन समाजप्रबोधन अखेरपर्यंत केले होते. रोखठोक विचार सत्यवचनी व कट्टर धम्माचरण केले.म्हणूनच जनसामान्य यांचे ते लोकशाहीर आहेत.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर  यांनी केले. बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कालकथीत शाहिर माधव आण्णा भोसले यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त करंजपेठ (सातारा) येथे आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला.तेव्हा अनिल वीर बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहिर श्रीरंग रणदिवे होते.

                  अनिल वीर म्हणाले, “लोकशाहीरांनी स्वतःच्या घराबरोबरच नातेवाईक व समाज  यांना तंतोतंत असे धम्मज्ञान दिले होते.त्यामुळेच समाजातील सर्व घटक निस्सीम प्रेम करीत आहेत.” शाहिर श्रीरंग रणदिवे म्हणाले, वीर सरांनी दिलेल्या उपाधीप्रमाणे लोकशाहीर यांनी आम्हा कलावंतावर गारुड घातले होते.त्यांनी त्रिरत्न व पाईसा कलामंचबरोबर साह्य केल्याने सर्वत्र जलसा आढळून येत आहे.     डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले,”७० वर्षे झाली प्रस्थापितांवर बहुजन कार्यकर्ते वाटचाल करीत आहेत. तेव्हा बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांवर वाटचाल केली पाहिजे.”

   

सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे सचिव बी.एल.माने म्हणाले, “जीवन ही एक कला आहे.तिचा पुरेपूर लाभ शाहिरांनी समाजहितैशी केला होता.” यावेळी माजी प्राचार्य चंद्रकांत मस्के,माजी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने,धम्ममित्र ठोंबरे आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.प्रारंभी महापुरुष व कालकथी भोसले यांच्या प्रतिमेस भोसले कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शाहिर रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.संपूर्ण विधी यशपाल बनसोडे यांनी पार पाडला.सदरच्या कार्यक्रमास जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव नंदकुमार काळे,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे, मारुती भोसले,अशोक घोडके, अंकुश धाहिंजे,किशोर गायकवाड,कल्पना कांबळे आदी धम्मबांधव, उपासक, उपासिका, सर्व भोसले परिवार,नातेवाईक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here