शाहु कलामंदिरमध्ये दि.३१ रोजी “भारतीय संविधान- मेरी जान” कार्यक्रमाचे आयोजन 

0

अभिनेते माने व गझलकार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी उदघाटन करणार !

सातारा/अनिल वीर : येथील शाहु कलामन्दिरमध्ये दि.३१ रोजी  सायंकाळी ६ वाजता युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने , “भारतीय संविधान मेरी जान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  शहर व जिल्ह्यातील जे नागरिक देशभक्त, स्वातंत्र्य,अभिव्यक्त, देश,सामाजिक मूल्य,भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यावर दृढ विश्वास ठेवतात. तसेच कायम जबाबदार व सामाजिक संवेदनशीलपणे भारतीय नागरिक म्हणुन आपली कर्तव्य पार पाडतात. अशा सर्व भारतीय नागरिकांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन देशाचा स्वातंत्र्य कार्याचा आणि भारतीय संविधानाचा गौरव, उद्घोष, राष्ट्राप्रती सन्मान अधिक व्यापक दृढ व्हावा. या विचाराने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधान – मेरी जान या गीत गायन, गझल, शेर शायरी,  कविता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या मध्ये भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे यांच्या विचारांचा प्रचार करणारा अनोखा संगीतमय गीत गझल कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी करणार असून अभिनेते, विचारवंत किरण माने मार्गदर्शन करणार आहेत.गझलकार अशोक गायकवाड व सहकारी टीम (पुणे) यांचा पहाडी आवाजातील गझल गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सामाजिक कार्यक्रमासाठी आपण सर्वानी देणगी पावती करावी. तसेच आपण दिलेल्या देणगी रकमेतून  आपल्याला कार्यक्रमाचे तिकीट मिळेल. तरी सर्वानी देणगी देवून या कार्यक्रमाला हातभार लावावा. कार्यक्रम देणगी रक्कम रु.१,०००/ -,रु.२,५००/- व रु.५,०००/- अशी आहे. आपल्याला डोनेशन पावती हवी असेल तर ती दिली जाईल.तेव्हा सर्वांच्या देणगीची अपेक्षा असुन प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा. असे आवाहन युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्थेच्या टीमने केले आहे.अधिक माहितीसाठी –  ९२७००५५१५१/ ८८०६३५८०६४/ ९९२२६३८२७१/ ८३२९८२०८३६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here