सातारा/अनिल वीर : मलकापूर – आगाशिवनगर येथे जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य अखंडीत ठेवण्यासाठी शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती व रमजान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राजू भाई मुल्ला (नगरसेवक, मलकापूर नगर परिषद) होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दलित मित्र भगवानराव जाधव यांनी शिवजयंती व रमजान ईदचे महत्व सांगून प्रास्ताविक केले. प्रमुख मान्यवरंपैकी अजितदादा सांडगे, आदिल भैया, डॉ.सारिकाताई गावडे आदींनी मनोगत व्यक्त केले.सदरच्या कार्यक्रमास शेवाळे (भाजपा शहराध्यक्ष), बापू जंत्रे (भाजपा उपाध्यक्ष), डॉ. सारिकाताई गावडे ( भाजपा सातारा जिल्हाध्यक्षा महिला आघाडी),राहुलदादा यादव (जिल्हा संघटक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ), आदिल भैया मोमीन, डॉ.सतीश थोरवडे, वसीम भैया आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्यावतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.शीरखुर्मा व जिलेबीचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गायकवाड, स्वप्निल जाधव, शंकर बेले, सुधीर जाधव, नितीन जाधव, विनायक चव्हाण, सागर वाघमारे, सागर वीर कायदे सदस्य उपस्थित होते.