शिरंबेच्या सरपंच पदी पद्मा भोसले तर उपसरपंच पदी विक्रम गायकवाड यांची निवड. 

0

कोरेगाव (नामदेव भोसले) :

           ‌.                    शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आज उपसरपंच च्या निवडीमध्ये सरपंच पदी पद्मा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रिती काळे सहाय्यक निबंधक कोरेगाव यांच्या निरीक्षक यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदी विक्रम गायकवाड यांची निवड झाली. विरोधी सौ.विद्या शंकर भोसले यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता.परंतु त्यांनी पाच मिनिटे अगोदर अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. ही निवडणूक पार पाडण्यासाठी अॅड.नितीन भोसले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली खासदार आनंदराव अडसूळ यांचे सहकार्य लाभलं. तसेच विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या विचाराची ग्रामपंचायत आज दोन्ही पॅनल मधील सदस्य एकमत होऊन ही उपसरपंच ची निवड बिनविरोध करण्याची यशस्वी वाटचाल शिरंब्याच्या ग्रामस्थांनी अस्तित्वात आणली. यावेळी कॅप्टन महादेव भोसले, महादेव गोडसे अमोल हुंबे, यात्रा कमिटी अध्यक्ष संजय गायकवाड, सत्यवान भोसले, ह.भ.प.नामदेव भोसले, राहुल चव्हाण, संतोष भोसले, गजानन भोसले, सागर गोडसे, अनिल गायकवाड,राहूल भोसले व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यात भाग घेवून ही निवडणूक बिनविरोध करून घेतली व ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे शिरंबे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व वाजत गाजत सर्व देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी वंदन करण्यासाठी सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी गुलालाची उधळण करीत सर्व मंदिरांना भेट देऊन आशिर्वाद घेतले.

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here