सातारा/अनिल वीर : श्री जननी कुंभळजाई माता मंदिर,शिरवली, ता.महाबळेश्वर येथे सोमवार दि. १ मे पासून प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम सुरू हो असून बुधवार दि.३ रोजी सांगतासमारोह आहे.
सोमवार दि.१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत क्षेत्र महाबळेश्वर – पार व शिरवली अशी श्रींच्या पालखीची मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार दि.२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत गावातून (विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते श्री जननी कुंभळजाई मंदिर) पालखीची मिरवणूक,दुपारी २ वा.हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी ४ वा.होममिनिस्टर,संगीत खुर्ची आदी कार्यक्रम होणार आहेत.७ वा. महाप्रसाद,रात्रौ ९ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवार दि. ३ रोजी पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत देवाच्या विधानाची महापूजा, १० वा.अभिषेक,११।। वा. मंदिराला प्रदक्षिणा,दुपारी १२ वा. सद्गुरू बळी गिरीनाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन, पौराहित्य – संदेशदादा महामुनी महाराज व विनायक जंगम महाराज.रात्रौ ९ वा.स्वागत समारंभ व क्रिकेट स्पर्धाचे बक्षीस वितरण व तदनंतर भजनी बुवांचा डबल बारी भजनांची मैफिल रंगणार आहे.