शिवउद्योग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी किरण हादवे 

0

अनिल वीर सातारा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना महिला जिल्हा प्रमुख म्हणून किरण हादवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            त्यांचे सामाजिक काम व व्यवसायिक कुशलता पाहिल्यानेच नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उद्योग समूहांना योग्य मार्गदर्शन व महिला सक्षमीकरण  करण्याचे काम प्रामाणिकपणे त्या करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

             संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद,सरचिटणीस प्रकाश ओहोळ व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेंद्र भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली हादवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील विविध स्तरांतून पुढील वाटचालीसाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here