अनिल वीर सातारा : ज्ञानसूर्य फाउंडेशनच्यावतीने छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय संविधान संमेलनाचे आयोजन रविवार दि.२३ रोजी भाग्यश्री मंगल कार्यालय ढेबेवाडी, ता.पाटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी १० वा.स्वरांगणा शिवभीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.११।। वा. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.यावेळी पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थान इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे भूषवणार आहेत. मार्गदर्शक ऍड.सुरेश माने व प्रमुख पाहुणे म्हणुन विनोद निकाळजे उपस्थीत राहणार आहेत.दुपारी १२ वा. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवराय व संविधान जाणुन घेणे मार्गदर्शन होणार आहे. समारोप्रसंगीही स्वरांगणा शिवभीम गीतांची मैफिल रंगणार आहे.तेव्हा शिव व सविधानप्रेमींनी उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.