सातारा दि. 14 – पाटण तालुक्यातील मल्हार पेठ येथील शिवांजली पतसंस्था व गणेश ग्रामीण बिगर शेती पतसंस्था पेठ शिवापूर या गुन्ह्यांच्या प्रकरणी तपासासाठी विशेष अधिकारी नेमण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, पोलीस उपअधिक्षक श्री. लावंड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणाचा तपास लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, नागरिकांना त्यांच्या ठेवींची परतफेड लवकर होईल असे पहावे.
यावेळी श्री. देसाई यांनी या गुन्हाच्या तपासकामाची माहिती घेतली. त्यामध्ये काही मालमतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच याकामी जलद गतीने तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली.