सातारा/अनिल वीर : शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूल, म्हावशी शाळेचे उज्वल यश संपादन केले आहे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीमध्ये दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले कु.भूमिका संभाजी गोंधळी – २४८ गुण व कु.संस्कृती विजय घाडगे – २४४ गुण घेऊन यश संपादन केले आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी ११ अध्ययनार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत.त्यामध्ये कु.गौरी रामचंद्र पवार – २३६ गुण, कु.अंकिता नवनाथ पडवळ- २२२- गुण, कु.रोशनी प्रकाश पवार -२१० गुण,कु. श्रावणी भरत पाटील- २०८ गुण, अनिकेत प्रकाश मराठे – २०२ गुण, कु. माधवी अशोक संकपाळ – २०२ गुण, कु.प्रणाली सूर्यकांत घाडगे – २०२ गुण,कु. समीक्षा दिलीप संकपाळ-२०२ गुण,कु.सलोनी नथुराम दाभाडे-१९२ गुण, कु.वैष्णवी बाबा भिसे १७४ गुण व कु.वैशाली आत्माराम माने १५८ गुण घेऊन यश मिळविले आहे.याबद्धल कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंहजी पाटणकर, उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील,जॉईंट सेक्रेटरी डॉ.सुहास देशमुख, संचालक संजीव चव्हाण,याज्ञसेन पाटणकर व संचालक, शंकरराव घाडगे व नूतन सरपंच सौ. मयुरी चव्हाण व सर्व सदस्यांनी शाळेचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.