शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणीसाठी भूमी लँड रेवेन्यू कन्सल्टी संस्था जिल्ह्यात कार्यरत… नारायण जावलीकर

0

काशिळ ; ग्रामीण भागातील शेतकरी व त्यांच्या शेतीच्या समस्या त्यांना आयुष्यभर भेडसावत असतात सातबारा व त्यावर असणाऱ्या नोंदी मालकी हक्क लगतच्या शेतकऱ्याने केलेली अतिक्रमण अतिक्रमण काढण्यासाठी कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा कोणती कागदपत्र आवश्यक आहेत, विविध प्रकल्पासाठी संपादित केलेले क्षेत्र व मूळ सातबारा वरून कमी न होणे प्रत्यक्ष वहिवाट एकाची सातबारा दुसऱ्याच्या नावावर, दोन पिढ्या झाल्या वाटप पत्र नाही, पुनर्वसन व त्यांच्या असणाऱ्या भोगवाट सदरी क्रमांक एक व दोन धारण प्रकार व त्यातील असणाऱ्या समस्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवण्यासाठी सातारा जिल्ह्यात भूमी लँड रेवेन्यू कन्सल्टसी स्थापन करून प्रयत्न केला जातो यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संस्थेची संपर्क साधावा असे आव्हान संस्थेचे संचालक नारायण जावलीकर यांनी केले.

ठोसेघर तालुका सातारा येथील शेतकरी व शेती विषयक समस्या या कार्यशाळेत उपस्थित ना मार्गदर्शन करताना जावलीकर बोलत होते.कार्यशाळेचे उद्घाटन वन समितीचे चेअरमन व सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भूमी लँड कन्सल्टन्सी या संस्थेचे विद्यमान संचालक कुमार भुरके उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या महसूल खात्याच्या व स्वतःच्या सातबारे वरील हस्तलिखित दोष संगणक प्रणालीमध्ये महसूल खात्याकडून झालेले अन्याय वन विभागाने संपादन केलेले क्षेत्र त्यावरील अतिक्रमणे पुनर्वसन व संपादन क्षेत्रातील प्रत्यक्ष वहिवासी येणारे कमी क्षेत्र सात बारा वरील असणारे एकूण क्षेत्राखालील संपूर्ण लागवडीखाली असणारे क्षेत्र भोगवाट संदर्भ उद्भवणारे प्रश्न आधी प्रश्नावर सविस्तर चर्चा करून सोडवण्यासाठी भूमी लँड रेवेन्यू कन्सल्टन्सी संस्थे समोर गाऱ्हाणी मांडली.

शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेऊन योग्य दिशादर्शक मार्गदर्शन करून संस्थेमार्फत संबंधित खात्याशी संपर्क करून झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी आश्वासन भूमी लँड कन्सल्टी संचालक कुमार भुरके यांनी उपस्थित त्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here