जिल्हा कृषी विभाग यांच्याकडे विकास हादवे यांची मागणी
सातारा/अनिल वीर : शेतकऱ्यांना फसवणा-यावर कायदेशीर कार्यवाही करावी.अशी मागणी जिल्हा कृषि अधिक्षक यांच्याकडे केली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी सुरू असून बऱ्याच तालुक्यामध्ये अनुदानित बी-बियाणे व खताचा तुटवडा आढळून येत आहे.अशा शेतकऱ्यांकडून तक्रारी होत असून याबाबत कृषी विभागाने तातडीने अनुदानित खते बी-बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खते व बी बियाणे मिळतील.असे नियोजन करून सर्व कृषी केंद्र व निविष्ठा धारक यांच्यावर नियंत्रण ठेवावे. बऱ्याच कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना घेतलेल्या मालाचे बिले दिले जात नाहीत. योग्य दरामध्ये खत व बियाण्याचे पैसे घेतले जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याची अडवणूक होत आहे.ही बाब अतिशय गंभिर आहे.यासाठी कृषी विभागाने तसेच जिल्हा कृषी अधिक्षक, सातारा यांनी विविध भरारी पथके तालुक्याच्या स्तरावर नेमून तपासणी करावी व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या खते बी बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा.अन्यथा, वेळप्रसंगी आपल्या दालनात आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विकास महादेव हादवे यांनी दिला.