श्रम हे कामगारापासून वेगळे करता येत नाही : कॉ.मुक्ता मनोहर

0

अनिल वीर सातारा : येथील नगरवाचनालयांच्या पाठक हॉलमध्ये कामगार संवाद मेळावा अल्फा  लवाल एम्लाईज युनियन आणि क्रेन एम्लाईज युनियन  यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदरचा मेळावा शहीद भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आला होता.प्रथमतः प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तेव्हा प्रमुख वक्त्या कॉ. मुक्ता मनोहर होत्या.अध्यक्षस्थानी उदय भट होते.  कॉ.मुक्ता मनोहर यांनी आताचा समाज कसा आहे ? हे सांगितले.शिवाय,कामगारांची मते जाणून घेतली.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा, सामाजिक बांधिलकी न जपणारा व रूढी परंपरा न मानणारा हा आजचा समाज आहे.यावर कामगारांनी एकवाक्यता दाखवली.त्या पुढे म्हणाल्या,”पूर्वी राजेशाही व्यवस्था होती. त्यानंतर कामगार, कारखानदार व भांडवलदार आले.तशी जातीप्रथा सुद्धा आली. जातीप्रतीमध्ये स्त्री पुरुष समानता कधीच नव्हती.

 

कामगारांची व्याख्या म्हणजे श्रम हे कामगारापासून वेगळे करता येत नाही. तेव्हा मशीनवर  उभे राहून काम करावे लागते. कामगारांच्या सर्व कॅपॅसिटीचा ताबा भांडवल लोक घेतलेला पहावयास मिळतो. भांडवलशाहीचा इतिहास ५०० वर्षाचा आहे.माणूस आणि इतर प्राणी यामध्ये फरक आहे. इतर प्राण्यांनी निसर्गाला जशास तसे स्वीकारलेली आहे. परंतु मानवाने निसर्गाचा जशास तसे स्वीकारले नाही तर आपल्या सोयीनुसार स्वीकारलेले आहे. प्राण्यांची व पक्षांची घरं ही युगानयुगे तशीच राहिली आहेत. मानवांची घरी काळानुसार बदलत गेली. अगदी सुरुवातीला माणूस गुहेमध्ये राहत असेल नंतर छपरे आली त्याच्यानंतर कौलारू घरी आले मातीची घरी आली. नंतर वीट माती दगडची घरं आली.आतातर सिमेंटची बंगले आलेली आहेत. निसर्गाला आपल्या सोयीनुसार बदल करून स्वीकारलेले आहे. माणूस बदलत गेला उत्क्रांतीच्या सिद्धांत मांडला. डार्विनचा सिद्धांत स्वीकारला. म्हणून माणूस हा निसर्गात राहून इतरांपेक्षा वेगळा आहे. गॅलिलिओ ने दुर्बिनिचा शोध लावला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे दाखवून दिले पण ख्रिश्चन धर्म गुरुनी  ते मान्य केले नाही.गॅलिलीओ गेलेल्या धर्माच्या विरोधात बोलतो. म्हणून माफी मागावी लागली व त्यांनी माफी मागितली व आपले काम चालू ठेवले.शिक्षण हे महाग होत चाललेले आहे.गरीबाची  मुलांना शिक्षक घेता येत नाही. तर कामगारांनी गरिबांची मुले दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणली पाहिजे. शाळांना आपण गरीब शाळांना संगणक द्यावा.”

                    उदय भट म्हणाले, “प्रस्थापित समाजाने स्त्रियांना गुलामगिरीत ठेवले होते. जातिव्यवस्था मोडायची असेल तर प्रस्थापित लोकांना विरोध केला पाहिजे.प्रस्थापित समाज हा ब्राह्मणांचा गुलाम होता. राजेशाही जबरदस्तीने कर गोळा करत असत. दुष्काळ जरी पडलेला असला तरी कर भरावाच लागत असे. 

जिजाऊनी सोन्याचा नांगर पुण्यामध्ये फिरावला. त्यांनी शेती करायला सुरुवात केली.१८५७ साली हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुध्द लढले होते. त्यामुळे हिंदू मुस्लिमांना एकत्र ठेवल्यास आपण देशावरती सत्तेवर राहु शकत नाही. हे इंग्रजांनी जाणले होते.त्यामुळे हिंदू मुस्लिममध्ये द्वेश पसरवला.” ४०० वर्षाचा इतिहास काढून औरंगजेबाच्या कबरीचा वाद निर्माण करायचा ? यावर भाष्य करीत ते पुढे म्हणाले, “युनियनचे कामगारांची कायदे काढून घेऊन कट रचनेचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे २० मे २०२५ रोजी होणाऱ्या संपामध्ये सहभागी व्हावे. शिवाजी महाराजांनी एक तरी कबर तोडली आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून आपल्या गडावर गड  हिंदूंसाठी मंदिर बांधल्यावर माझ्या मुस्लिम बांधवांना येथे नमाज पडण्यासाठी मशीद कुठे आहे ? असे प्रश्न शिवाजी महाराजांनी उपस्थित केला होता. तेव्हा मुस्लिमांसाठी मशिदी बांधण्यात आली होती.तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून दाभोलकरांचा खून केला.”

    यावेळी अल्फा लावल युनियन अध्यक्ष सोमनाथ  बाबर, क्रेन युनिययन अध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सचिन पवार, विक्रम इंगळे, विकास तोडकर, सचिन पवार, राजेंद्र पवार आदी मान्यवर यांच्यासह कामगार व पत्रकार उपस्थित मान्यवर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here