श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त  फलटण मँरेथाँनचे आयोजन 

0

फलटण प्रतिनिधी..

                  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथे मॅरेथॉन स्पर्धांची आयोजन करण्यात आले आहे. दोन मे 23 रोजी मोदी महात्मा फुले चौक फलटण येथे या स्पर्धांची सुरुवात होणार आहे.. फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती , फलटण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.. सर्व वयोगटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .

 मँरेथाँन मधील वयोगट व अंतर खालीलप्रमाणे आहेत 

                 . मुले – 18 वर्षे आतील – 5  कि. मी.मुली – 18 वर्षे आतील-  3  कि. मी.पुरुष – खुला गट -10  कि.मी.महिला – खुला गट – 8  कि.मी.पुरुष  –  45  वर्षापुढील – 3  कि. मी.महिला – 45  वर्षापुढील – 2  कि.मी नाव नोंदणी  अंतिम तारीख 28/04/2023 आहे . …

             खुला गट ( पुरुष व महिला ) यांना खालीलप्रमाणे पारितोषिक रक्कम व ट्राँफी  असणार आहे प्रथम क्रमांक 5001, द्वितीय क्रमांक 3001 आणि तृतीय क्रमांक 2001 याप्रमाणे रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहे  सोबत ट्रॉफी देण्यात येणार आहे..

                     18  वर्षे  गट (मुले – मुली) व  45  वर्षापुढील पुरुष व महिला  यांना खालीलप्रमाणे पारितोषिक रक्कम व ट्राँफी  दिल्या जाणार आहेत. प्रथम क्रमांकास 3001 द्वितीय क्रमांक 2001 आणि तृतीय क्रमांकास 1001 याप्रमाणे रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत..  . प्रवेश पी 20 रुपये असून स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ठीक सहा  वाजण्यापूर्वी उपस्थित राहावयाचे आहे  नाव नोंदणी  अंतिम तारीख 28/04/2023 आहे .  आणि नाव नोंदणी केलेल्या  स्पर्धकांनी प्रवेश फी जमा करुन आपले चेस नंबर दि. 29 व 30  एप्रिल  2023  रोजी  सकाळी 7.00 वा. ते दु.1.00 वा. या वेळेत मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज , फलटण येथून घेऊन जावयाचे आहेत…

*अधिक माहितीसाठी संपर्क -1). नामदेव  मोरे 9960082120 2) .जनार्दन पवार 928476599 3) सचिन धुमाळ   9890382204 4)  राज जाधव9226139653 5)  डाँ. स्वप्नील पाटील770901629  6) .तुषार मोहिते 9423888344 7) .तायाप्पा शेंडगे  9322848199  8).उत्तम  घोरपडे9421121031 9) . सुरज ढेंबरे 8805777998 10).सुहास कदम 7083720520    रजिस्ट्रेशन करणेसाठी लिंक- 

https://forms.gle/of4GtENq3gjHL1F78

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here