फलटण
श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर ता. माण येथे तीर्थक्षेत्र फाउंडेशनच्या माध्यमातून एक कोटी शिवलिंगाची पूजा आयोजित करण्यात आलेली आहे. गुरुवार दि. 16 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत लिंगार्चन होणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन व ध्वजवंदन 3 फेब्रुवारी रोजी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
त्यासाठी लागणारे शिवलिंग कुबेर नर्मदेश्वर येथून विशेष वाहनाने आणण्यात आले आहेत. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूजा होणार आहे. एक हजारापेक्षा अधिक वैदिक गुरुजींच्या माध्यमातून ही पूजा संपन्न होणार असून प्रत्येक भाविकांसाठी लिंगार्चनाच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान भाविकांसाठी लक्ष भोजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सातारा, सोलापूर, जिल्ह्यासह विदर्भ मराठवाडा येथील भाविकांना या सोहळ्याचे आकर्षण आहे, तीर्थक्षेत्र फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन बडवे, स्वागत अध्यक्ष शेखर मुंदडा ,सचिव मंदार बडवे, चिन्मय बडवे ,अनिल बडवे, बाळासाहेब खाडे आणि अन्य समिती सदस्य हे यासाठी क्रियाशील आहेत. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे हजारो स्वयंसेवक शिंगणापुरात दाखल झाले आहेत.