सहाशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
नसिर शिकलगार,पुसेगाव दि.22 : महाराष्ट्र गुजरात कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परम पूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साह पूर्वक वातावरणात संपन्न झाली.
मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी चौक पुसेगाव या ठिकाणापासून सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव यांनी झेंड्याच्या इशाऱ्यावर मॅरेथॉन स्पर्धकांना सोडण्यात आले ही स्पर्धा पाच किलोमीटर व दहा किलोमीटर या अंतरामध्ये होती यामध्ये ६०० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये पुरुष गटामध्ये 16 ते 35, 35 ते 50, व 50 वरील व महिलांमध्येही याच प्रमाणे गट पाडण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुरुष गटात 16 ते 35 वयोगटात अनुक्रमे अनिकेत शिंगणे, रोहन तोंडले,आदित्य सुतार, 35 ते 50 वयोगटात कृष्णा सोनमळे, सुनील शिवणे,पंकज जाधव, 50 वर्षावरील पांडुरंग पाटील, रवींद्र जगदाळे,शिवाजी पाटील यांनी क्रमांक पटकावले.
तर महिला गटात 16 ते 35 वयोगटातील दिशा फडतरे, धनश्री वसव, गौरी गोरे, 35 ते 50 वयोगटात स्मिता शिंदे, अल्मास मुलांनी, नेहा गलांडे,50 वर्षावरील संगीता उबाळे, साधना धनवडे,सुरेखा कांबळे तर 16 वर्षाखालील मुले संकेत पोळ, अथर्व काळे, पुष्पराज फरांदे, 16वर्षाखालील मुली अनुष्का शिंदे, रिमा गोंडाळ, श्रद्धा पोळ यांनी या स्पर्धेत क्रमांक पटकावले विजेच्या स्पर्धकांचे तसेच सहभागी स्पर्धांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव,संतोष वाघ,बाळासाहेब जाधव, गौरव जाधव,सचिन देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच विविध मंडळाच्या वतीने स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी व मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी चांगल्या प्रकारे मोलाचे सहकार्य केले.