संपूर्ण दीप रामायण कार्यक्रम संपन्न
सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित श्रावण मासारंभानिमित्त ज्येष्ठ गझलकार कवी दीपक करंदीकर लिखित “संपूर्ण दीप रामायण” कार्यक्रमामधील ओव्यांचे अभिवाचनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहाची प्रचिती सातारमध्ये दिपलक्ष्मीच्या माध्यमातून शिरीशी चिटणीस विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात.खरोखरच,स्तुत्य असेच उपक्रम होत असल्याचे गौरवोद्गार काका पाटील यांनी काढले.येथील दीपलक्ष्मी सांस्कृतीक हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी,श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट साताराचे सचिव रामदास बोधे, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन चेअरमन काका पाटील, पुणे शहर प्रतिनिधी म.सा.प. पुणे शिरीष चिटणीस, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर तसेच संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. ओवीबद्ध रामायण पोथी ग्रंथातील निवडक भागांचे अभिनव अभिवाचन सहभागी अभिवाचक दीपक करंदीकर, विनिता दाते, विनया जोशी यांनी सातारकर रसिक श्रोत्यांसमोर सादर केले. सदरच्या कार्यक्रमात दीपक करंदीकर, विनिता दाते, विनया जोशी यांचा अल्पसा परिचय परिचय असा दीपक करंदीकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ८०/९० च्या दशकातील कवींच्या पिढीत काव्यबद्ध संपूर्ण रामायण लिहिणारा कवी म्हणून प्रसिद्धी व लोकमान्यता मिळविणारा पहिला व एकमेव कवी ठरणारे आहेत. कवी गझलकार लेखक नाटककार व स्वलिखीत संपूर्ण दीपरामायणकार म्हणून दीपक करंदीकर प्रसिद्ध आहेत.मसापचे कार्यवाह आहेत.गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य आहेत.
विनिता दाते या संपूर्ण दीपरामायण अभिवाचनात उत्स्फूर्त सहभाग आहे.विनया जोशी या हार्मोनियम वादक असून अंध व्यक्तींना रोजचे वर्तमानपत्र सामाजिक काम म्हणून रोज वाचून दाखवतात. दिपकच्या संपूर्ण दीपरामायण अभिवाचनात उत्स्फूर्त सहभाग असतो.सहजसुंदर वाचनपद्धतही असते.यावेळी आग्नेश शिंदे, शुभम बल्लाळ,रमेश महामुलकर, लोकमंगलचे शिक्षक व सातारवासीय श्रोतावर्ग मोठ्या संख्येनी उपस्थिर होता.