सातारा/अनिल वीर : संगीत हा विषय अनुभूती घेण्यासारखा आहे.जीवन समृद्ध करण्याची कला ही संगीतच आहे. असे प्रतिपादन दिपक खांडके यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी पतसंस्था व कराओके सिंगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “जिंदगी का सफर” या गाण्याच्या रंगारंग मैफिलीमध्ये खांडके बोलत होते.यावेळी बाळासाहेब शिरकांडे, शिरीष चिटणीस, सागर पावसे, विजय साबळे, विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
दिपक खांडके म्हणाले,” आज अखेर अनेक कलावंतांचे मोठे योगदान आहे. संगीत हे आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत गायले जाते.संगीता विषयी बोलण्यासारखे बरेच काही आहे. परंतु संगीत हा विषय अनुभूती घेण्यासारखा आहे. ज्या ज्या कलाकारांनी या संगीताला स्पर्श केला आहे. किंबहुना संगीताने ज्या कलाकारांना स्पर्श केला त्यांचे आयुष्य समृद्ध झालेले आहे.आयुष्य जगत असताना कलेचा ध्यास घेतला पाहिजे. परंतु संगीत ही जीवन समृद्ध करण्याची कला आहे.” त्यांनी, “दयाघना का तुटले चिमणे घरटे उठलो बंदी असा मी अरे जन्म बंदी वास सजा इथे प्रत्येकास…” असे गीत सादर केले.
शिरीष चिटणीस म्हणाले, “सर्वत्र कराओकेच्या माध्यमातून गीतांचे सादरीकरण होतं असल्यामुळे सर्वत्र नवचैतन्य असे वातावरण दिसत आहे.घरामध्ये टीव्ही समोर बसणारी मंडळी कार्यक्रमाला येऊ लागली आहेत.शिवाय,गाणीही म्हणू लागली आहेत. त्यामुळे जुनी चांगल्या गाण्यांच्या आठवणी जागृत होतात. त्यामुळे समाजामध्ये हलचल व अभिसरण हा महत्त्वाचा भाग चालू झाला आहे. “जिंदगी का सफर” या कार्यक्रमासंदर्भात बोलताना चिटणीस म्हणाले, राजेश खन्ना या नावाचे एक युग होते.ज्याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्याची संकल्पना पुढे आली आहे. राजेश खन्ना यांच्या बाबतीत किशोर कुमार यांचे नाव घेतले जाते किशोर कुमार व राजेश खन्ना यांचे युग ” आराधना” या अजरामर फिल्म पासून चालू झाले. आराधना चित्रपटाने संगीताला आदर्श दिला. तसेच संगीत युगाला जन्म दिला या फिल्म मधील ” मेरे सपनो की रानी कब आएगी तू”, ” रूप तेरा मस्ताना ” यासारख्या गीतांनी त्याकाळच्या युवा पिढीवर जणू जादूच केली होती.त्या काळात जेव्हा गाण्यांचा खडखडाट होता व जेव्हा श्रोत्यांना बदल हवा होता त्यावेळेस राजेश खन्ना यांच्यासाठी किशोर कुमार यांनी अप्रतिम गीते गायली होती. किशोर कुमार व अशोक कुमार हे नट व गायक दोन्ही होते. तसेच त्या वेळच्या नुरजहा गायिका ह्या अभिनेत्री सुद्धा होत्या मोठ्या गायिका झाल्या असत्या परंतु त्यांनी खाण्यामधील पथ्य पाळली नाहीत. तसेच त्या पाकिस्तानला गेल्या नसत्या तर त्यांचे नाव सुद्धा संगीत विश्वात अधोरेखित झाले असते.”
विजय साबळे यांनी साताऱ्यातील नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ देत नवोदित गायक घडवत आहेत. यावेळी येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत आपण संगीत महोत्सवाचे आयोजन करणार आहोत असेही अभिवचन दिले.आग्नेश शिंदे यांनी आभार मानले.