संजय हा युवकांचा आधारवड होता : भीमराव दाभाडे

0

सातारा : संजय दाभाडे या युवकांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केला  होता.खरोखच ते युवकांचे आधारवड होते.असे विचार आदरांजलीपर भीमराव दाभाडे यांनी व्यक्त केले. पाटण तालुक्यातील म्हावशी गावचे राजरत्न समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष संजय आण्णा दाभाडे यांच्या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमात अनेकांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली. परवाच,कालकथीत सोनाबाई दाभाडे यांच्या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमास संजय दाभाडे वावरत होते. पुण्यानुमोदनचा कार्यक्रम राजरत्न बुद्ध विहार येथे संपन्न झाला.संजय दाभाडे हे तरूण तडफदार आणि करारीबाणा असलेले स्वाभिमानी नेतृत्व होते. एक निष्ठावंत कार्यकर्ते जो स्वतः शिक्षण घेऊन आपल्या उन्नती बरोबर समाजाची उन्नती करण्याचा प्रयत्न करत होता.

समाजातील गरजू धम्मबांधव यांना मदत करीत असत.ज्यांना मायेचा हात देतो.त्यांच्या दुःखावर पांघरूण घालतो. तोच खरा सुसंस्कृत युवक म्हणून कार्य करीत होते.असे सुसंस्कृत असणारे आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजय दाभाडे यांच्या जाण्याने फार मोठे नुकसान झाले आहे. मंडळाची अनेक कामे शासकीय योजनेतून पार पाडली आहेत. बुद्ध विहारात ग्रंथालय, स्पीकर,मंडप,सभा मंडप तसेच धम्म गुरू भदंत यांची राहाण्याची सोय करून धम्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी प्रयत्नशील कार्य करीत होते.धम्म कार्याचे त्यांचे स्वप्न मात्र अधूरे राहीली आहेत.अशाही भावना राजरत्न समाज उन्नती मंडळ व बौद्ध विकास सेवा संघ यांच्यावतीने तालुकाध्यक्ष भीमराव दाभाडे यांनी व्यक्त केल्या. सदरच्या कार्यक्रमास आबासाहेब भोळ,रविंद्र सोनवणे,दगडू तांदळे, आनंदा गुजर ( बौद्धाचार्य ), कैलास चव्हाण ,राजरत्न समाज उन्नती मंडळाचे मुंबई व पुणे शहरातून आलेले पदाधिकारी, म्हावशी गावातील ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य उपस्थित होते.बौद्ध विकास सेवा संघ मुंबई  – पाटण तालुका कार्याध्यक्ष एस,बी, जाधव,संघाचे महासचिव राजाराम भंडारे,कोषाध्यक्ष अनिल मोहिते (समता सैनिक दल कमांडर) आदी मान्यवरांनी शोकसंदेश पाठविले होते.

भिमराव दाभाडे (बौद्ध विकास सेवा संघ मुंबई पाटण तालुका अध्यक्ष) यांनी आपल्या मनोगत व्यक्त करीत असताना  मंडळातील जेष्ठ कार्यकर्ते कालकथीत भाऊसाहेब दाभाडे, बौद्ध विकास सेवा संघाचे संस्थापक महासचिव व संघाचे संस्थापक हिशोब तपासणीस व संघाचे शेवटचे अध्यक्ष ऍड बी,टी,कांबळे यांचा राजरत्न मंडळाच्या स्थापनेपासून ते दिवंगत अरुण दाभाडे यांनी विहारासाठी शासकीय योजनेतून बुद्ध विहार बांधले. संजय दाभाडे यांनी सभा मंडप शासकीय योजनेतून पूर्ण केला होता. भविष्यात विहारात बौद्ध धम्म गुरू भदंत ठेवून धम्माचा प्रसार व प्रचार व्हावा. अशा प्रकारे अनेकांना सहकार्य केले.आपल्या गावातील जेष्ठ विचारवंतानी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून आपले कुटुंबीयांचे संगोपन करून तरुणांनी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात कार्यरत राहून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. संजय दाभाडे यांच्या पत्नी माया व मुलगी अनुष्का यांना राजरत्न समाज उन्नती मंडळ सहकार्य करेल.” बौद्धाचार्य आनंदा गुजर यांनी धम्म विधी पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजरत्न समाज उन्नती मंडळ मुंबई शाखाध्यक्ष अमरजीत कांबळे होते.पुण्यानुमोदनचा कार्यक्रम हा म.ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी होता.त्यामुळे व्यस्त कार्यक्रमामुळे चंद्रकांत खंडाईत व अनिल वीर यांनी म्हावशी गावास भेट देऊन शोक व्यक्त केला. संजय या युवकाने केवळ औषधे बंद केल्याने अर्ध्यावरच डाव संपवला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here