पुसेगाव दि.20
साहित्यधारा बहुुद्देशिय सेवा भावी संस्था आयोजित संविधान अमृत महोत्सवं मोठ्या उत्साहात येत्या दिनांक 25 डिसे. 2024 रोजी हम्पी कर्नाटक राज्य, हॉटेल शिल्पा ग्रँड येथे संप्पन होणार आहे. त्याचबरोबर एक दिवशीय कवी संमेलन- पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर संघर्ष सावळे यांनी दिली आहे.
25 डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यातील हम्पी या शहरात वरील कार्यक्रम घेण्यात येणार असून त्या करिता उदघाटक म्हणून जेष्ठ साहित्यिक व गझलकार डॉ.एड. विजय कुमारजी कस्तुरे चिखली जिल्हा बुलढाणा व अध्यक्ष स्वतः डॉ.संघर्ष सावळे आहेत.त्याच दिवशी स्वर गीतांचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे.त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून गायिका एड. रागिणी प्रतापसिंगदादा बोदडे सा.रे.ग.मा पा. फेम, व गायिका,सेलेब्रीटी,अँकर सुचिता गजभिये भंडारा ह्या आहेत. सर्व मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्रतील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वंना पुरस्कार दिला जाणार आहे.
त्यापैकी ह्रदयनाथ हिवराळे, विश्वभर झोडपे, सौ.जयश्री विश्वभर झोडपे.छ संभाजीनगर, दौलतरावं खरात चिखली जिल्हा बुलढाणा, रजणी चक्रे अकोला.ई. मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार केला जाईल.त्याच बरोबर हंपी, बदामी,गोकरणा, मुर्डेश्वरई.ऐतिहासिक,संस्कृतिक,पर्यटणं स्थळाचा आनंद घेण्यात येणार आहे.अश्या प्रकारे साहित्यामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम महाराष्ट्र बाहेर घेऊन नवीन संधी नवीन प्रेरणा काही नव-नवीत कवींना व साहित्यिकांना देऊन नक्कीच समतेचे बीजे पेरण्यास मदत होईल.त्यातून एक दिवस सर्व धर्म समभाव ही भावना केवळ साहित्य संमेलन च्या माध्यमातून होऊ शकते.असे मत व या मागचा उद्देश डॉ.संघर्ष बळीराम सावळे व्यक्त करीत आहे.