अनिल वीर सातारा : आता आलीय जाग.. बाबासाहेबांच्या विचारांची फुलवायची आहे बाग ….अशी भीमगर्जना करीत ना.रामदास आठवले म्हणाले,”बाबासाहेब आपल्या जीवनात आल्याने आधुनिक असे परिवर्तन झाले आहे.तेव्हा संविधान विरोधी कृती करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी जर वाघनखे हातात आली.तर जसे शिवरायांनी अफजल खानाचा वाघनख्यांच्या सहाय्याने कोथळा काढला होता. तसे केले जाईल !”
येथील तालीम संघाच्या मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष राजाभाऊ सरोदे होते.
ना.रामदास आठवले म्हणाले, “सुभेदार रामजी साताऱ्यात आले होते. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण व भिमाईचा मृत्यू साताऱ्यात झाल्याने अनन्यसाधारण महत्व आहे. भिमाईभुमी ही अस्मितेचा प्रश्न असून आंबेडकरवाद्यांचा शक्तिस्थान व प्रेरणास्थान आहे.आजूबाजूची जागाही स्मारकासाठी रितसर घेतली पाहिजे.” त्यामुळे भव्यदिव्य भिमाई स्मारकाचे काम सुमारे ४ कोटी खर्च करून करावे.अशी पक्षाची मागणी असल्याचाही पुनरुच्चार ना.आठवले यांनी केला.बाबासाहेब यांचे आयुष्य अधिकचे असते तर आजचे चित्र वेगळे दिसले असते.पक्षाचा वटवृक्ष नक्कीच झाला असता. पक्षाची बांधणी त्यांनी केली होती.मात्र,त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापना करण्यात आली.सत्ता असो अथवा नसो.सातत्याने लढले पाहिजे.म्हणुच सत्तेपर्यंत पोहचलो आहोत. अजुनही पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. बहुजन समाजातील जातीने आपला पक्ष म्हणून सामील व्हावे.असेही आवाहन ना. आठवले यांनी केले.
नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबापू गायकवाड म्हणाले,”जातीय वाद्याबरोबर पक्ष गेला असला तरी जिवंत ठेवला आहे.तेव्हा सत्तेत जावुनच जमात बनवायची आहे.तेव्हा कटू सत्य असेल पण सत्तेचा वाटा सर्वाँना मिळाला पाहिजे.आम्ही लढायला कायमच तयार असतो. फक्त लढ म्हणा,नक्कीच बाजीप्रभूपेक्षा नक्कीच दुप्पटीने लढू .” पावसाचे वातावरण असतानाही पाऊस येणार नाही. त्यासाठी आपण अर्ज केला आहे.असा मिश्किल टोलाही अशोकबापू गायकवाड यांनी लगावला.
महिला आघाडीच्या सीमाताई रामदास आठवले म्हणाल्या,” कार्यकर्त्यांच्या मागणीला न्याय मिळेल.जर न्याय मिळतं नसेल तर शर्यत बिनधास्त लावा ! आमचा पक्ष सदैव तयार आहे.राज्यात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.त्याचीही सोडवणूक पक्ष करेल.”
राजाभाऊ सरोदे म्हणाले,”१९५७ ला पक्षाची स्थापना झाली तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मद्रास येथील एल.शिवराज यांची निवड झाली होती.तेव्हा पक्षाचा चढता क्रम आढळून येत आहे. यावेळी सर्व पातळीवरील पदाधिकारी यांचे मार्गदर्शन झाले.संपूर्ण मैदान खचाखच भरले होते.