सातारा : सद्गुरूशी शिष्याचं नातं घट्ट असल्याशिवाय शिष्यत्व प्राप्त होणार नाही कारण, सद्गुरू ही व्यक्ती नसून शक्ती आहे, असे प्रतिपादन संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी केले. संत निरंकारी मिशनचा विशेष सत्संग सोहळा येथील सत्संग भवनात सोमवारी (ता. 3) सायं. 7 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी झांबरे बोलत होते.
या सत्संग सोहळ्यास बारामतीसह मोरगाव, फलटण, भिगवण आदी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. संत निरंकारी मिशन हे अनुमानावर नाही तर अनुभवावर चालणारे मिशन असल्याचे सांगून झांबरे म्हणाले, निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ह्या व्यक्ती नसून शक्ती आहे. प्रत्येक निरंकारी अनुयायी हा व्यक्तीशी जोडलेला नसून शक्तीशी जोडून भक्ती करत असल्याने ही भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, असे सांगितले.
प्रवचनाच्या शेवटी म्हणाले, भक्तीतील पहिली पायरी ही विश्वासाची असते. अट्टल दरोडेखोर वाल्या कोळ्याने महर्षी नारदावर विश्वास ठेवल्यानेच वाल्याचा वाल्मीक ऋषी झाल्याचा इतिहास आहे.भाव व्यक्त केले. तर सूत्रसंचालन तेजस घोरपडे यांनी केले.