सातारा : ज्येष्ट पत्रकार अनिल वीर हे सर्व क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करीत आहेत.म्हणूनच त्यांना सर्वहारा ही पदवी शोभु शकते.असे गणेश कारंडे यांनी जाहीर केले. फुले दाम्पत्य सन्मान दिन अर्थात, वर्षारंभी झालेल्या सन्मानदिनी कार्यक्रमात कारंडे यांनी सर्वहारा असा उच्चार करीत वीर यांना दिलेल्या पदवीचा पुनरुच्चार करून चंद्रकांत खंडाईत यांच्या हस्ते पुष्प देऊन शिक्कामोर्तब केला.अभ्यासपूर्ण असा आश्चर्याचा धक्का कारंडे यांनी देऊन कारणमीमांसा सांगितली.
” राज्यात मुलींसाठी पहीली शाळा सुरु करणारे फुले दाम्पत्य होत. बहुजन समाजाला शिक्षण, विद्येचे दान देणारे व तहानलेले जनतेला आपला हौद खुला करुन देणारे समाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चर्चा करण्यात आली.दि.१ जानेवारी १८४८रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा फुले दाम्पत्यानी सुरू करून बहुजनांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.” प्रथमत: अनिल वीर,प्रकाश खटावकर, वसंत गंगावणे व सुभाष सोनावणे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सामुदायिक विधी पार पाडण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास रवींद्र भालेराव,विलास सावळे, रवींद्र बाबर,अश्विन भिसे, आदित्य बेले,सिद्धांत शिंदे,प्रतिक बनसोडे,रामदास वाघमारे,प्राची जावळे,लेखणी जावळे,स्नेहल जावळे,नितीन जावळे,वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, रमेश गायकवाड समितीचे उपाध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. जावळे, स्नेहल जावळे,नितीन जावळे, वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, रमेश गायकवाड समितीचे उपाध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.