सातारा : धम्माचा प्रचार-प्रसार करणारे गुणिजन सत्कारास पात्र ठरलेले आहेत.त्यांचा सन्मान हा बळ देणारा ठरणार आहे.यापुढे अधिकाधिक कार्य नक्कीच त्यांच्या हातुन घडेल.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले. येथील सांस्कृतिक भवन (मिलिंद कॉलनी) मध्ये वर्षावास प्रवचन मालिका – २०२४ आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात गावोगावी जाऊन सातारा तालुक्यातील बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल प्रवचन देणाऱ्या प्रवचनकार तसेच पश्चिम जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांचा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे (प.) अध्यक्ष अशोक भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले.तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून अनिल वीर मार्गदर्शन करीत होते.
अनिल वीर म्हणाले, “धम्माचे कार्य नीटनेटके व नियोजनपद्धतीने चालले आहे. धम्म कार्य करीत असताना अहंकारवृत्ती व कुटनीती करता कामा नये.बोलण्या-वागण्यात लीनता असली पाहिजे.वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्वांनी वाटचाल केली पाहिजे.आपला सर्वश्रेष्ठ धर्म असल्याने पालन केल्याने काहीही कमी पडणार नाही.तेव्हा संतुष्ट राहण्यास शिकले पाहिजे.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना अशोक भालेराव म्हणाले, “वर्षावास काळात प्रवचनकार व जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांनी गावोगावी सुमारे शेकडो मालिका चांगल्या पध्दतीने घेऊन प्रबोधन केलेले आहे.त्यामुळेच शाबासकीची जी थाप मिळाली आहे.तेव्हा धम्माचे कार्य प्रज्ञान व गुणगान कार्यकर्ता म्हणुन पुढील कार्य करण्यास सतर्क झाले पाहिजे.”
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे यांच्या कल्पकतेने गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनी आकर्षक सन्मानिका,पुष्पगुच्छ व शाल या स्वरूपात गुणिजनांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये केंद्रीय शिक्षक भागवत भोसले, नंदकुमार काळे,संगीता मंगेश डावरे,समाधान कांबळे, प्रसाद गायकवाड,किरण कांबळे, तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे (सातारा),नितीन गायकवाड(महाबळेश्वर),आनंदा गुजर(पाटण),काशिनाथ गाडे (जावली) बी.जे.माने (कराड), आनंदा कांबळे(वाई) आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अनेक मान्यवरासह पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केली.
सदरच्या कार्यक्रमास बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते आप्पा अडसुळे, सुनील सपकाळ,उत्तम पवार आदी जिल्हा,तालुका पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.