नागठाणे : नागठाणे (सातारा) मा. आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या पत्नी सौ.समताताई मनोज घोरपडे यांनी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे संस्थापक पिताश्री प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्त नागठाणे सेवा केंद्राला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली ब्रह्माकुमारी विद्यालयाचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांचा 56 वा स्मृतिदिवस नागठाणे सेवा केंद्राने साजरा केला.
यावेळी सौ. समताताई मनोज घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व माउंट आबू राजस्थान या ठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त केली या विद्यालयाच्या कार्याची ही त्यांनी प्रशंसा केली. या कार्यक्रमाला बहुसंख्य लोक उपस्थित राहिले. ब्रम्हाकुमारी विद्यालयाच्या जगभरामध्ये 142 देशांमध्ये शाखा आहेत तसेच भारतामध्ये साडेदहा हजार होऊन शाखा आहेत या विद्यालयांमध्ये तणाव मुक्ती, व्यसनमुक्ती, मन शांती, बालविकास केंद्रे चालवली जातात या विद्यालयाचा मुख्य उद्देश मूल्यनिष्ठ समाज घडवणे हा आहे.