समाजभूषण पुरस्काराने प्रतिभा कांबळे,प्रा.जाधव व वाघमारे सन्मानित

0

अनिल वीर सातारा : डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व समृद्ध फाउंडेशन, नॅशनल आंबेडकर राइट्स अँड बुद्धिस्ट फाउंडेशन व आदर्श मैत्री फाउंडेशन या सर्व संस्थांच्यावतीने एक दशका पेक्षा जास्त काळ या पुरस्काराचा सोहळा सुरू आहे. या सर्व संस्था संघटनांच्यावतीने अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समाजभूषण पुरस्कार जिल्ह्यातील प्रतिक्षा किरण कांबळे,प्रा.रोहिदास जाधव व गणेश वाघमारे यांना नुकताच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.तिघांना पुरस्कार मिळाल्याने आपसूकच जिल्ह्याने हॅटट्रिक साधली आहे.

 

प्रतिभा कांबळे यांची प्रतिक्रिया, “दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल कराडच्या माध्यमातून बुद्ध – बाबासाहेबांच्या विचारांची नवी पिढी घडवण्यासाठी माझी छोटीशी धडपड सुरू आहे. या धडपडीला प्रोत्साहन आणि ऊर्जा देण्याचे काम या पुरस्काराने केले आहे. या यथोचित सन्मानामुळे यापुढील काम करण्याची जबाबदारी निश्चित वाढली असून आणखीन वेगाने सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी कार्य करत राहण्याची ग्वाही मी देते.” याबद्दल कांबळे मॅडम,प्रा. जाधव व वाघमारे या त्रयींचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here