सातारा : शिवजयंती दिनी दि.१९ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक समाजश्री अनिल वीर यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर टीमवे कंपनीच्यावतीने चेअरमन वेंकटेश करसुळे यांच्या हस्ते येथील हॉटेल मानसी प्राईड येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली. गुरुदास अडागळे यांनी सूत्रसंचालन केले.सदरच्या कार्यक्रमास पीएसआय सुरेश शिंदे,विनोद धाडे,सागर लोहार, अशोक जाधव,संजय जाधव, विजय सुपेकर,डॉ.बाबासाहेब ननावरे व चं.जगताप उपस्थीत होते.
विश्वरत्न कला मंचने नुकताच वीर सर यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर केल्यामुळे ठिकठिकाणी अभिनंदपर सत्कार सोहळे संपन्न झालेले आहेत.