समाजाचे देणे लागतो म्हणुनच संधीचे सोने करावे.

0

पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते डॉ.प्रियांका जाधव यांचा सत्कार

सातारा : पारधी समाजात बदल होत आहे.जर त्यावर संशोधन करून कु. प्रियांका यांनी पीएचडी   पूर्ण केली आहे.त्यामुळे  मिळालेल्या संधीचे नाक्किच  त्या सोने करतील.असे गौरवोद्गार महाराष्ट्र भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे उपाध्यक्ष मच्छिन्द्र जाधव यांनी काढले.

    पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते डॉ.कु.प्रियांका अशोक जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा मच्छिन्द्र जाधव बोलत होते. डॉ.प्रियांका यांचे शिक्षण एम.एस.डब्ल्यू.एम.फिल. पीएचडी असे झालेले आहे.

             मच्छिन्द्र जाधव म्हणाले,  “समाजासाठी प्रत्येकांनी योगदान दिले पाहिजे.नवनवीन ज्ञान युवापिढी अवगत करीत आहे. नव्या पिढीमध्ये सुसंवादही आधुनिक पद्धतीने होत असतो. तेव्हा पालकांनी आपापल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन स्वतःबरोबर समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संधी निर्माण करून दिली पाहिजे.” अशाच पद्धतीने उपस्थित मान्यवरांनी डॉ.प्रियांका जाधव यांच्याबद्धल गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   सत्कारास उत्तर देताना डॉ. प्रियांका जाधव म्हणाल्या, “पारधी समाजाचा दररोजचाच संघर्ष पहायला मिळत आहे. भीमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेत्या सुनीता भोसले यांच्या सहायाने समाजासाठी प्रबोधनात्मक कार्य करीत आहे. समाजात पोटासाठी अजूनही संघर्ष चालू आहे.पद्मश्री मानेदादा व त्यांची सर्व टीम पाठीशी असल्याने नव्या जोमाने कार्यरत राहणार आहे.”

   समारोपप्रसंगी पद्मश्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा-विनिमय करण्यात आला. यावेळी साहेबराव शिंदे, रमेश वैदू ,दीपक जाधव, कैकाडी उन्नती समाजाचे राज्य अध्यक्ष रामभाऊ जाधव,बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार विजेते हरिदास जाधव,महाराष्ट्र राज्य बेंजो-बँड असोशिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, जयसिंगराव जाधव, रामचंद्र जाधव,रमेश जाधव,  अनिल वीर आदी मान्यवर, जाधव परिवार उपस्थित होते. नारायण जावलीकर यांनी प्रास्ताविक,  स्वागत व सूत्रसंचालन केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here