गोंदवले – भोसरे ता.खटाव येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजी नामदेव गुजर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 बडोदा येथे तंजावरचे राजे बाबाराजे भोसले व फलटणचे शिवरूपराजे खर्डेकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी सहकारी मंडळ बडोदाचे अध्यक्ष श्री. गौरव पवळे यांनी आयोजन केले होते.
पुरस्कार प्राप्त झालेबद्दल सयाजी गुजर याचे अखिल भारतीय जीवा सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सोमनाथ काळे तसेच भोसरे ग्रामपंचायतीचे सरपंच,सर्व सदस्य व ग्रामस्थ मित्र मंडळी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
छाया – पुरस्कार प्रदान करताना बाबाराजे भोसले व शिवरूपराजे खर्डेकर व मान्यवर.