सातारा : सर्वधर्मसमभाव ….या प्रमाणे धर्मनिरपेक्षता सर्वांनीच राखली पाहिजे. बुद्धांनी शुद्ध धम्म दिला आहे. त्यामुळे जातीयतेचा नायनाट झाला आहे.तेव्हा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी गट-तट पक्षवैगरे बाजुला ठेवुन संघटित झाले पाहिजे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे महासचिव चंद्रकांत (दादा) कांबळे यांनी केले.
सम्यक ज्येष्ट नागरिक संघातर्फे करंजे (सातारा) येथील बबन वन्ने यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा चंद्रकांत कांबळे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी अंकुश(भाऊ) होते.कांबळे पुढे म्हणाले, “जातीचा उल्लेख होता कामा नये.तरच सर्व धर्म गुण्यागोविंदाने नांदतील.(जी जातीचे जुनी नावे आहेत.तिचा उच्चार होता कामा नये.) बाबासाहेबामुळे आपण प्रगत झालो आहे.त्यामुळे आधुनिकतेची कास धरून शुद्ध धम्माप्रमाणे शुद्ध आचरण करणे गरजेचे आहे.”
माजी प्राचार्य चंद्रकांत मस्के म्हणाले,”स्मृतीचे जतन करण्यासाठी मानवाने चित्त अबाधित ठेवले पाहिजे. अष्टांगमार्गच जीवन चांगल्या पद्धतीने घडविते.” मारुती भोसले म्हणाले,”बाबासाहेबांनी बुद्धांचे जे विचार दिले आहेत. त्याप्रमाणे मानवाने वाटचाल करावी.”
सौ.पवित्रा ब.वन्ने म्हणाल्या, “धम्माची चळवळ ही यशस्वी होण्यासाठी थोरा-मोठयांचा विचार व आशीर्वाद घेणे गरजेचे आहे.तरच भावी पिढी घडविण्यासाठी साह्य होईल.” सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे सचिव बी.एल.माने म्हणाले, “अष्टांग मार्गाचे पालन प्रत्येकांनीच केले पाहिजे.धम्माचे आचरण हेसुद्धा त्याच्या चालण्या-बोलण्यात आढळुन आले पाहिजे.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर म्हणाले,”धम्माचे आचरण केल्याने नुकसान होत नाही. पुनर्जन्म ही संकल्पनाच आपल्या धम्मात नसल्याने त्याचा उच्चारही गैर आहे. थोडक्यात, जन्म व मृत्यू हा एखदाच असल्याने तो चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करूया.”
विधिकार बौद्धाचार्य यशपाल बनसोडे यांनी संपूर्ण विधी पार पाडला.प्रथमतः महापुरुष व कालकथित श्री.व सौ.यांच्या प्रतिमेस सर्व वन्ने कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.सर्वच उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन मुरलीधर खरात यांनी केले.बी.एल.माने यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. बबन वन्ने यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास प्रिया वन्ने,प्रीतम वन्ने,सुप्रिया वन्ने, विजय मस्के,विजय देशमुख, अरुण बनसोडे,श्री.व सौ. शांतीलाल भोसले,शंकर चव्हाण, गायकवाडसर,माया जाधव, अशोक भोसले,श्री.व सौ.सुखदेव घोडके,विविध क्षेत्रातील मान्यवर, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.