सर्व क्षेत्रातील अव्वली बहुआयामी व्यक्तिमत्व !

0

सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर सर्व क्षेत्रात कार्यरत असतात.ते स्वतः कॉलेजला शिकत असतानाच सन १९९१ पासून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महनीय व्यक्ती/संस्था यांना बंधुत्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी बंधुत्व पुरस्कार देऊन सन्मानीत करीत आलेले आहेत. 

         हा सर्व प्रपंच ते कोणत्याही शिफारशीविना ते करतात.कारण, समोरील व्यक्तीस/संस्थेस ते जवळून बघत असतात.काहीजण तर गौरविलेल्या व्यक्तीबद्धल खाजगिरीत्या हरकत घेत असतात.तो त्यांचा विचार असेल असे समजुन अनिल वीर डोळेझाक करतात.कोणताही मनुष्य सर्वश्रेष्ठ/सर्वगुणसंपन्न असूच शकत नाही.मात्र,त्याने चुका दुरुस्त करीत करीत परिपूर्ण होण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे.त्याने अनेक गुरूकडून चांगले घेतले पाहिजे.अनिल वीर यांनी अनेकांना सन्मानीत केले असले तरी त्यांनाही विविध प्रकारचे स्थानिक,जिल्हा,राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.कोरोना काळात विविध संस्थेचे १० पुरस्कार मिळाल्यानंतर  महायोद्धाही पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे पुरस्कार देव-घेवबाबतही त्यांची कोणतीही अभिलाषा राहिलेली नाही.मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ते नक्कीच कार्यरत राहतील.

             आज सर्व क्षेत्रात नम्रपणे वावर असणारे बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणुन अनिल वीर यांच्याकडे पाहिजे जाते.अनिल वीर सर्वधर्मसमभाव मानणारे असल्याने त्यांचा सर्व क्षेत्रात वावर असतो.जिथे आग्रह व प्रेम असते.तिथे ते प्राधान्य देतात. प्रत्येकाने आपला धर्म वाढवावा. मात्र,अवंडबर नसावे.

           त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेकांना आपलेपणाने जवळ केलेले आहे.थोर व महापुरुषांच्या विचारांवर वाटचाल करीत असतात.त्यांचे अनेक गुरू आहेत.कारण,सर्वगुणसंपन्न असणारे व्यक्तिमत्व दुर्मिळच. तेव्हा प्रत्येकाजवळचे जे चांगले आहे.ते घेण्याचे काम निरंतर करीत असतात.स्वतःबरोबरच सर्वांनीच आनंदी राहिले पाहिजे. असा त्यांचा आग्रह असतो. विशेष म्हणजे अनिल वीर सकारात्मक व विशालदृष्टिकोणातून नेहमीच उत्साही राहत असतात.म्हणूनच त्यांना अनेकांनी अभिष्टचिंतनपर शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here