गोंदवले – गोंदवले खुर्द ता माण येथील श्री गोपाल कृष्ण पंचक्रोशी बिघर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मधुकर मोरे यांची तर व्हा चेअरमन पदी पिंपरी येतील राहुल राजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती माण तालुक्याच्या सहाय्यक निबंधक शिंदे मॅडम यांनी दिली.
येथील गोपाल कृष्ण पंचक्रोशी बिघर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये मधुकर मोरे हे नेतृत्व करत असलेल्या गोपाल कृष्ण सभासद परिवर्तन पॅनेलचे 10 उमेदवार विजयी होत एक हाती सत्ता मिळलेली होती तर सत्ताधारी विरोधी पॅनेलची एक जागा बिनविरोध आणि 1 जागा विजयी झाली होती
निवडणूकी नंतर काल संस्थेच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक शिंदे मॅडम यांच्या उपस्थित निवडी निमित्त सर्वजण उपस्थित होते सर्वप्रथम चेअरमन पदासाठी श्री मधुकर मोरे यांनी व व्हा चेअरमन पदासाठी राहुल राजगे यांनी आपला अर्ज अध्याशी अधिकारी यांच्याकडे सादर केला त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज न सादर केल्याने अध्याशी अधिकारी शिंदे यांनी या दोघांच्या निवडी जाहीर केल्या यावेळी नूतन संचालक आप्पासाहेब फाळके, ज्ञानदेव गेंड,जिजाबा शेडगे,तानाजी पोळ,अभय शेडगे,विजय कुलकर्णी,सुवर्णा कदम, नीता पोळ, यावेळी माजी सरपंच अर्जुनराव शेडगे,आनंदराव पोळ,प्रभाकर पोळ,विठ्ठल गाढवे,दशरथ घोडके,विनायक कुलकर्णी, तुळशीराम शेडगे,गणेश शेडगे,जालिंदर पोळ,बाळासाहेब कदम माजी व्हा चेअरमन डॉ राजगे,पिंपरीचे उपसरपंच राजगे, संस्थेचे व्यवस्थापक शंकर कदम,सुनील कदम,सर्व कर्मचारी उपस्थित होते
मधुकर मोरे आबा हे गोपाळ कृष्ण पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्था निर्माण झाली तेव्हा पासून त्यात ते कर्मचारी म्हणून कार्याला सुरुवात केली तिथून लेखणीक व्यवस्थापक ते सरव्यवस्थापक अशी पदोन्नती मिळवत सध्या त्याच संस्थेच्या चेअरमन पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा बहुमान त्यानी मिळवला आहे