सातारा : समाजमंदिर,विहार, सांस्कृतिक भवन अशी जी जी सार्वजनिक ठिकाणं असतात.ती व्यक्तिगत कोणाच्याही मालकीची नसतात.तेव्हा सार्वजनिक अथवा सामाजिक कार्यासाठी खुले करण्याचे निर्देश देण्यात येतील. असा खुलासा नगरपालिकेचे उपमुख्यकार्यकारी अ.म.दामले यांनी पुन्हा एखदा स्पष्ट केले आहे. येथील नगरपालिकेत शिष्टमंडळाने भेट देऊन मिलिंद हौसिंग सोसायटीमधील सांस्कृतिक भवनबाबत निवेदन उपमुख्यकार्यकारी अधिकारी अ.म.दामले यांना देण्यात आले होते.कार्यवाही मात्र ठामपणे होत नाही.मागील पौर्णिमेस संयोजक शाहिर श्रीरंग रणदिवे यांना चावीसाठी दारोदार भटकावे लागले.शेवटी रडत-कडत चावी मिळाली.तो पर्यंत नियोजित अतिथी व मान्यवर यांना ताटकळच प्रतिक्षा करावी लागली.तेव्हा पुनःपुन्हा असा प्रकार होता कामा नये.यासाठी पुनःपुनः शिष्टमंडळ पालिकेत जात आहे.
तारीख पे तारीख न्यायाने… असे होवू नये.यासाठीच दामले साहेब यांच्याबरोबर शाहिर श्रीरंग रणदिवे,ऍड.विलास वहागावकर, ऍड.हौसेराव धुमाळ,अशोक भोसले,अनिल वीर आदींनी पालिकेत भेट घेतली.तेव्हा अंतिम व ठोस भूमिका घेऊन संबंधितांना कळविण्यात येईल.असेही एकमताने ठरले.
सदरचे भवन नगरपालिकेच्या हद्दीत असून बांधकामही त्यांनीच पूर्ण केलेले आहे.तेव्हा सध्या स्थानिक रहिवासी असणारे अध्यक्ष व सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यानी कुलूप लावून मज्जाव केला होता.तेव्हा सम्बधितांनी सखोल चौकशी करून सार्वजनिक खुले करावे. असे असताना चावीसाठी टोलवाटोलवी करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे.असेही निदर्शनास येत आहे.फी जर असेल तर सार्वजनिक व सुरक्षित निधी जमा करून डागडूजीसाठी वापरता येईल.तेव्हा पालिकेने तेथील साफसफाई करण्यासाठी कर्मचारी यांची नेमणूक केली तर तेथील देखभालही व्यवस्थितरीत्या करता येईल. शिवाय, परिसरातील बगीचाचे सुशोभिकरणास मदत होईल.
तेव्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या ज्या उपाययोजना असतील त्या त्या राबवाव्यात.अशीही चर्चा करण्यात आली.तेव्हा लवकरात लवकर निर्णय द्यावा.अशीही भावना पुन्हा एखादा संतप्त धम्मबांधव यांनी व्यक्त केली आहे. पहिल्यांदा दिलेल्या निवेदनावर भिक्खू थेरो दिंपकर, रमेश इंजे, शामराव बनसोडे, चंद्रकांत खंडाईत,प्रकाश सावंत, अशोक भोसले,दिलीप शंकर भोसले, गणेश कारंडे, विश्वास सावंत, सुभाष सोनावणे, वसंत गंगावणे, सुखदेव घोडके, अशोक कांबळे, अंकुश धाइंजे, उत्तम पोळ,विजय गायकवाड, दिलीप फणसे,अरुण साळुंखे,ऍड. हौसेराव धुमाळ, प्रकाश सावंत, माणिक आढाव आदींच्या स्वाक्षरी आहेत.