साडेचार लाख रुपयांच्या खतविक्रीस बंदी; फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

0

दुधेबावी : फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.यामध्ये चार लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री  बंद करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी संयुक्त कारवाई केली.
शेतकऱ्यांनी  बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांची खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, असे श्री. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ”कृषी निविष्ठा खरेदी करताना दुकानदाराकडून पक्की पावती घ्यावी, तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी करावी. बनावट भेसळयुक्त कीटकनाशकांची खरेदी टाळण्यासाठी कीटकनाशकाचे वेस्टन पिशवी खरेदीची पावती व त्यातील थोडे कीटकनाशक जपून ठेवावे.
कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. खतांच्या खरेदीची पावती पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते खरेदी करताना परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या निविष्ठाची पक्की पावती घ्यावी. सध्या तालुक्यामध्ये विविध कंपन्यांच्या बियाण्यांचा व रासायनिक खताचा मुबलक साठा उपलब्ध झालेला आहे.
दत्तात्रय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, फलटण

कीटकनाशकांबाबत घ्यावयाची काळजी

कीटकनाशके खरेदी करताना अंतिम मुदतीची खात्री करावी.

फवारणी करताना शिफारस केलेल्या डोसप्रमाणे द्रावण तयार करावे.

फवारणी वातावरण थंड आणि वारा शांत असताना करावी.

फवारणी सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाशाच्या दिवशी केली पाहिजे.

प्रत्येक फवारणीसाठी शिफारस केलेले स्प्रेयर वापरा.

फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी.

स्प्रे ऑपरेशननंतर, स्प्रेयर आणि बादल्या डिटर्जंट साबण वापरून स्वच्छ पाण्याने धुवावेत.

फवारणीनंतर ताबडतोब शेतात जनावरे, कामगारांना जाणे टाळावे.

कोणत्याही दुकानदाराने बियाणे व रासायनिक खतांची विक्री करताना शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, तसेच जादा दराने विक्री करू नये, असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
-नवनाथ फडतरे, गुण नियंत्रण निरीक्षक, पंचायत समिती फलटण. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here