सातारची सांस्कृतिक विद्रुपीकरण थांबवा :राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी !

0

अनिल वीर सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या सातारा शहराचे शासन मान्य सांस्कृतिक विद्रुपीकरण थांबवा/ रद्द करा / हटवा.या मागणीबाबत निवेदन राज्यपाल यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रिपब्लिकन सेना व जिल्ह्यातील पुरोगामी संघटना यांच्यावतीने सादर करण्यात आले.

      पश्चिम महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्याच्या राजधानीचे शहर असणाऱ्या सातारा शहराचे गेल्या १० वर्षा पासून जाणीव पूर्वक छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी विचारांची मोडतोड करण्यासाठी जाणीवपुर्वक विशिष्ट विचार श्रेणीच्या लोकांच्या मार्फत शासकिय मान्यतेने शहराचे सांस्कृतिक विद्रूपीकरन चालू करण्यात आले आहे. याला सर्व पुरोगामी पक्ष संघटनांनचा विरोध असतानाही शासनाच्या माध्यमातून विद्रूपीकरण आजही तसेच टिकून असल्याचे दिसत आहे.

यात छत्रपती शिवरायांचे वारसदार  केंद्राच्या व राज्याच्या सत्तेत सतत असताना सुद्धा हे विद्रुपीकरण चालू असल्याने आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल.अथवा, त्यांनाच याचा सांस्कृतिक वारसाच कळला नसल्याने त्यांच्यावर भिस्त न ठेवता आपणच लक्ष घालून हे विद्रूपीकरन थांबवण्याच्या सुचना संबंधीत यंत्रणेस द्याव्यात. सुशोभिकरण शहरात करण्याच्या नावाखाली क्षेत्र माहुली या ठिकाणी स्मशान भुमी विकसित करताना संबंधित ट्रस्ट मार्फत जाणीव पुर्वक तूकाराम महाराजांचा वैकुंठगमनाचा 

 

पुतळा मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. आणि त्या मार्फत तुकोबारायांचा खरा इतिहास पायदळी तूडवून सांस्कृतिक विद्रूपीकरण केले आहे.त्याला कडाडून विरोध असतानासुद्धा आजही तो पुतळा तसाच आहे. त्याच बरोबर सातारा शहरातील राजवाडा बस स्थानकाच्या परिसरात शिल्पसृष्टीच्या नावाखाली माननीय हायकोर्टाने सदर शिल्पावर बंदी घातली असतानाही जाणीव पुर्वक समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू असल्याचे शिल्प तयार करून लावण्यात आले आहे. सदर शिल्पाला कडाडून विरोध झाल्यानंतर गेली पाच ते सहा वर्ष झाली सदर शिल्प शासनाने झाकून ठेवले आहे. परंतू कोर्टाचा निर्णय असतानासुद्धा सदरचे शिल्प शासनाने अद्याप हटवलेले नाही. याला काय म्हणावे ? त्याचबरोबर नुकतेच महाराष्ट्र शासनाने कौशल्य, रोजगार,उध्योजकता व नागरिकता विभाग,शासन निर्णय क्र.आयटीआय. 2024/प्र.क्र.124/व्याशि-३. दिनांक-०४/१०/२०२४ या शासन निर्णयाने कोणत्या ही संघटनेची/पक्षाची/इतर संस्थेची मागणी नसतानाही येथील औद्योगिक शैक्षणिक संकुलाची नावे बदलण्याचा निर्णय करून ज्यांचा या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा समाजामध्ये उद्धाराचे कसलेही काम नसताना शहरातील आयटीआयचे नामकरण करून त्यास, “समर्थ रामदास स्वामी” यांचे नाव कोणालाही न सांगता देण्यात आले आहे.शासनानेच काढलेल्या आद्यादेशाची मोडतोड करून केले असल्याने समस्त पुरोगामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.तेव्हा तो निर्णय तातडीने रद्द करून सदरचे नाव तातडीने पुसून टाकण्यात यावे. याबाबत संबंधितांना तातडीने उचित कार्यवाहीचे निर्देश

द्यावेत. तसेच या क्षेत्रामध्ये ज्यांचे योगदान आहे अशा व्यक्तीचे नाव देण्यात यावे.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या सर्व बाबींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.अन्यथा, रिपब्लिकन सेना व विविध पुरोगामी विचारांच्या संघटना तीवृ स्वरूपाची आंदोलने करतील. याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील. यावेळी चंद्रकांत खंडाईत, पार्थ पोळके,विजय निकम,गणेश कारंडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here