(सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे मोलाचे सहकार्य )
गोंदवले – जिल्हा परिषद शिक्षण विभाग सातारा, सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यामधील सर्व मुख्याध्यापकांचे तंबाखूमुक्त शाळा अभियान विषयी कार्यशाळा घेण्यात आली.
उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना तंबाखूमुक्त शाळेचे 9 निकष कशा रीतीने पूर्ण केले पाहिजे टोबॅको फ्री स्कूल ॲपवर माहिती कशा रीतीने भरली पाहिजे,आपली शाळा तंबाखूमुक्त कसे केले पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था,खटाव यांच्यामार्फत सातारा, वाई,खंडाळा,कराड,महाबळेश्वर या तालुक्यातील मुख्याध्यापकांना पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आले.व उर्वरित फलटण,पाटण,कोरेगाव,माण,खटाव, जावळी या तालुक्यातील मुख्याध्यापकांना ऑनलाईन पद्धतीने माहिती देण्यात आली.
शाळा तंबाखूमुक्त करत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये तंबाखूचे दुष्परिणाम विषयी माहिती सांगून तंबाखू हे वाईट असल्याबाबत तंबाखू विरोधी मानसिकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे,विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त वातावरण व आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करणे, गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे व्यसन सोडवण्यासाठी या अभियानाचा उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
तंबाखू वर नियंत्रण आणण्यासाठी कोटपा कायदा 2003 कलम : (4) बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी कलम: (5) तंबाखूजन पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी कलम : (6अ) 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे तसेच मुलांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे दंडणीय गुन्हा आहे .
कलम :(6ब) शैक्षणिक संस्थांच्या शाळा, महाविद्यालय वगैरे चारही बाजूने 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी .
कलम :(7 ते 9 ) तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टर्नवर 85% चित्रमय वैधानिक सूचना असणे अनिवार्य आहे.अशा पद्धतीने कलम विषयी माहिती मुख्याध्यापकांना देण्यात आले.
2 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,सदर कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख यांचा मोलाचे सहकार्य लाभला आहे.
तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी मारुती भांगे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र खंदारे,सलाम मुंबई फाउंडेशनचे वरिष्ठ समुपदेशक शुभांगी लाड व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष) रवींद्र कांबळे व (सचिव)सौ.ज्योती राजमाने यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे .