शिरवळ : राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा सत्कार सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे व फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर येथे जाहीर सभा आहे. या सभेच्या निमित्ताने कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे पुणे येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होत असताना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच शिरवळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व सातारा जिल्ह्याच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत केले.
राज्यामध्ये बदलेल्या राजकीय परिस्थिती नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच सातारा मार्गे जात आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट संपूर्ण ताकतीने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे स्वागत करत शेकडो गाड्यांचा ताफा कोल्हापूरकडे मार्गस्थ झाला आहे.